Kojagiri Purnima : चंद्रग्रहणामुळे कोजागरीच्या दुधाचा गोडवा घटला; 30 टक्के मागणी कमी

Milk sold in the market
kojagiri purnima Due to eclipse  demand for milk decreased by 30 percent nashik news
kojagiri purnima Due to eclipse demand for milk decreased by 30 percent nashik newsesakal
Updated on

Kojagiri Purnima: कोजागरी पौर्णिमेमुळे दुधाच्या दराने उसळी घेतली. चंद्रग्रहणामुळे मात्र दुधाचा गोडवा घटला. इतर वर्षाच्या तुलनेत यंदा ग्रहणामुळे दुधाची ३० टक्क्यांनी मागणी घटली, अशी माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली. कोजागरी पौर्णिमेस दूध सेवन करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे.

दरवर्षी कोजागरीला दुधाचे दर आकाशाला भिडतात. या वर्षीही ९० ते १०० लिटर दराने दुधाची विक्री होताना दिसली. दरवर्षी शहरात हजारो लिटर दूध विक्री होते. वाढत्या दराने विक्रेत्यांना अधिक नफा मिळत असल्याने आनंदाचे वातावरण असते. (kojagiri purnima Due to eclipse demand for milk decreased by 30 percent nashik news)

यंदा मात्र चंद्रग्रहणामुळे त्यांच्या आनंदालाही काहीसे ग्रहण लागल्याचे बघावयास मिळाले. ९० ते १०० लिटर पार दर गेले असले तरी विक्रेत्यांमध्ये कभी खुशी कभी गम दिसून आले. त्याचे कारण म्हणजे ज्या विक्रेत्याचे पाच ते दहा हजार लिटर दूध विक्री होत होते. ग्रहणामुळे ती विक्री पाच ते सात हजारावर आली.

आजही बहुतांशी नागरिक ग्रहण सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३० टक्क्यांनी विक्री घटली. त्यामुळे विक्रेत्यांना मिळणाऱ्या नफ्यातही मोठी घट झाली. दुपारपर्यंत दैनंदिन ७० ते ८० रुपये दर होते.

सायंकाळी मागणी वाढणार या विचाराने पाच नंतर दरांमध्ये वाढ करण्यात आली. घडले मात्र विपरीतच. असे असले तरी दैनंदिन दूध नेणाऱ्यांची संख्या निश्चित असल्याने त्याचा आधार विक्रेत्यांना झाला.

kojagiri purnima Due to eclipse  demand for milk decreased by 30 percent nashik news
Kojagiri Purnima : कोजागरी पौर्णिमेवर चंद्रग्रहणाचे सावट; काही ठिकाणी आज होणार साजरी

या वेळी कोजागिरीने निराशा केली. अशा प्रतिक्रिया विक्रेत्यांकडून देण्यात आल्या.

नागरिकांमध्ये नाराजीचे सूर

सण सनावळी आली की दुधाचे दर वाढवले जातात. इच्छा नसताना तसेच दैनंदिन दुधाची भासणारी आवश्यकता यामुळे अधिक दर देऊन दुधाची खरेदी करावी लागते. शनिवार (ता.२८) कोजागरी पौर्णिमा असल्याने ७० ते ८० रुपये विक्री होणारे दुधाच्या दराने थेट शंभरी गाठली. शहरापासून दूर असलेल्या भागात यापेक्षाही अधिक दराने दूध विक्री झाल्याने नागरिकांच्या खिशाला झळ बसली. त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

"कोजागरी पौर्णिमा दुधाची मागणी अधिक होत असते. चंद्रग्रहण असल्याने शनिवारी हवी तशी मागणी झाली नाही. दूध विक्रीवर त्याचा मोठा परिणाम झाला. बाजारातील सरासरी दराप्रमाणे ९० ते १०० रुपये लिटर दराने दूध विक्री झाले." - नाना काळे, दूध डेरी, चालक

kojagiri purnima Due to eclipse  demand for milk decreased by 30 percent nashik news
Kojagiri Purnima 2023 : कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहणामुळे पिता येणार नाही दुधाचा प्रसाद?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.