Kojagiri Purnima 2023 : कोजागरी पौर्णिमा उत्सवासाठी कावडधारकांची सप्तशृंगगडाकडे कूच

Kavathar devotees from Trimbakeshwar who made their way to Saptshringigarh for Kojagari Poornima from Kushavarta. (Photo: Kamlakar Akolkar)
Kavathar devotees from Trimbakeshwar who made their way to Saptshringigarh for Kojagari Poornima from Kushavarta. (Photo: Kamlakar Akolkar)esakal
Updated on

Kojagiri Pournima : स्वयंभू आद्यशक्तिपीठ सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमा उत्सव व देशातील प्रमुख कावड यात्रेपैकी एक तसेच राज्यातील सर्वांत मोठी कावडयात्रा शनिवारी (ता. २८) होत आहे.

याच दिवशी तृतीयपंथीयांची (किन्नर समुदाय) छबिना मिरवणूक मोठ्या उत्साहात निघणार आहे. दरम्यान, राज्यासह मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात येथील हजारो कावडधारक विविध नद्यांचे पवित्र जल (तीर्थ) घेऊन नाशिक जिल्ह्याच्या सीमेपर्यंत दाखल झाले आहेत.

आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची मंगळवारी (ता. २४) उत्साहात सांगता झाल्यानंतर भाविकांना आता शनिवारी (ता. २८) होणाऱ्या कावडयात्रेची आस लागली आहे. (Kojagiri Purnima Festival kavaddhari on way to Saptashrungi gad nashik news)

गडावर चैत्रोत्सव, नवरात्रोत्सवाप्रमाणेच कोजागरी पौर्णिमा उत्सव (कावडयात्रा) होत असतो. चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवाप्रमाणेच भाविकांची या यात्रेसाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. चैत्रोत्सवाप्रमाणेच कोजागरी पौर्णिमा व कावड यात्रेसाठी पदयात्रेने येणाऱ्या भाविकांची संख्या लाखाच्यावर असते.

त्यात हजारो कावडधारक पुणे येथून मुळा नदीचे, साक्री, पिंपळनेर, शहादा, असलोद या ठिकाणाहून तापीचे, ओंकारेश्‍वर, इंदूर येथून नर्मदेचे, उज्जैन येथून क्षिप्रा नदीचे तीर्थ, भीमाशंकर येथून भीमा नदी आदी ठिकाणांहून चारशे ते सहाशे किलोमीटरहून अनवाणी प्रवास करून गडापासून सुमारे दीडशे ते दोनशे किलोमीटरपर्यंत दाखल झाले आहेत.

दिंडोरी तालुक्यासह जिल्हाभरातून हजारो कावडधारक रात्री उशिरापर्यंत त्र्यंबकेश्वर येथून रवाना झाले असून, ते आज व उद्यापासून गडाकडे कुशावर्तावरून कलश भरून मार्गस्थ होतील. तसेच नाशिक येथून रामकुंडातूनही हजारो कावडधारक गुरुवारी व शुक्रवारी गोदावरीचे जल घेऊन गडाकडे कूच करतील.

नवरात्रोत्सवादरम्यान कार्यरत असलेली प्रशासकीय यंत्रणा, सप्तशृंगीदेवी न्यास व ग्रामपंचायतीचीही यंत्रणा कावडयात्रेसाठी सज्ज आहे. शुक्रवार (ता. २७) व शनिवार (ता. २८) नांदुरी-सप्तशृंगगड रस्ता खासगी वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे.

Kavathar devotees from Trimbakeshwar who made their way to Saptshringigarh for Kojagari Poornima from Kushavarta. (Photo: Kamlakar Akolkar)
Kotamgaon Jagdamba Mata : 3 रूपांतील कोटमगावची जगदंबा माता

महामंडळानेही नवरात्राप्रमाणेच नांदुरी ते सप्तशृंगगड यादरम्यान १०० बस, तर नाशिक विभागातील ११ आगारांतून सुमारे ३०० बसद्वारे भाविकांच्या वाहतुकीचे नियोजन केले आहे.

दरम्यान, सप्तशृंगगडावर येणाऱ्या कावडधारक व पदयात्रेकरूंना विसावा, पिण्याचे पाणी व फराळवाटपाबरोबरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक ते वणी, मालेगाव, पिंपळनेर, सटाणा, कळवण या रस्त्यांवर अनेक स्वयंसेवी संस्थांनी तयारी सुरू केली आहे. रविवारी (ता. २९) सकाळी साडेसातला शांतिपाठ होऊन महाप्रसादाच्या वाटपाने नवरात्रोत्सव व कोजागरी उत्सवाची सांगता होईल.

कोजागरी पौर्णिमेनिमित्त होणारे विधी

@ शुक्रवार (ता. २७) अश्विन शु. १४ (पौर्णिमा प्रारंभ उत्तर रात्री ४.१७ मी.) सकाळी सातला पंचामृत महापूजा

@ शनिवार (ता. २८) ः सकाळी सातला पंचामृत महापूजा

@ दुपारी साडेबारा ते रात्री साडेआठपर्यंत कावडधारकांनी आणलेले जल श्री भगवती मंदिरात स्वीकारले जाईल.

@ श्री भगवतीचा रात्री नऊ ते बारापर्यंत जलाभिषेक महापूजा

@ रात्री बाराला भगवतीची महाआरती

@ रविवारी (ता. २९) सकाळी सातला देवी पंचामृत महापूजा

@ सकाळी साडेसातला शांतिपाठ व महाप्रसाद

Kavathar devotees from Trimbakeshwar who made their way to Saptshringigarh for Kojagari Poornima from Kushavarta. (Photo: Kamlakar Akolkar)
Kojagiri Poornima: कोजागिरी पौर्णिमेची पूजा विधीवत रित्या कशी करावी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()