Nashik Political: शरद पवारांना मानणारा दिंडोरी तालुका : कोंडाजी आव्हाड
Nashik Political : दिंडोरी तालुका शरद पवार यांना मानणारा तालुका असून, आजपर्यंत अपवाद वगळता त्यांच्याच विचाराचा आमदार तालुक्याला दिला आहे.
आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी, तसेच महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावेल असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी केले. (Kondaji Awad statement Dindori Taluka who respects Sharad Pawar Nashik Political news)
येथील वन विभागाच्या गेस्ट हॉऊसमध्ये दिंडोरी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व सेलच्या आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलार, प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, गोकुळ पिंगळे उपस्थित होते.
जिल्ह्याची जबाबदारी दिलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार झाला. जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी दिलेल्या खेडगावचे सरपंच दत्तात्रय पाटील यांचा विशेष सत्कार झाला.
तालुक्यातील सर्व गावांमधून शरद पवार यांच्यावर प्रेम करणारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत पक्ष बांधणी, आगामी निवडणुका, तालुक्यातील अडीअडचणीबाबत विठ्ठल संधान, सुदाम बोडके, अशोक नाईकवाडे, बाळासाहेब महाले, सुरेश पाटील, राहुल उगले, साहेबराव पाटील, नरेश देशमुख, ज्ञानेश्वर भोये, संगीता पाटील, शैला उफाडे आदींनी विचार मांडले.
गजानन शेलार, पुरुषोत्तम कडलक, गोकुळ पिंगळे, दत्तात्रय पाटील, श्याम हिरे यांनी मनोगतातून शरद पवार यांनी कृषिमंत्री म्हणून काम करताना दुसरी हरितक्रांती घडविण्याचे काम केले. इतिहासातील ७२००० कोटींची कर्जमाफी केली.
महिलांसाठी ५० टक्के आरक्षण त्यांनी महाराष्ट्रात सुरू केले. देशात सर्वांत अगोदर महाराष्ट्रात आदिवासींसाठी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करून बजेटमधून लोकसंख्येएवढी ९ टक्के रकमेची तरतूद केली.
सर्व समाजाला न्याय देण्याचे काम केले. त्यांचे विचारकार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी जाणीव त्यांनी सर्वांना करून दिली. तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांनी प्रास्ताविक केले. युवक जिल्हाध्यक्ष श्याम हिरे यांनी सूत्रसंचालन केले.
युवक विधानसभा अध्यक्ष संतोष रेहरे, मनोज थोरात यांनी आभार मानले. कादवाचे संचालक मधुकर गटकळ, विश्वनाथ देशमुख, त्र्यंबक संधान, साहेबराव पाटील, रघुनाथ पाटील, नामदेव धात्रक, फकीर देशमुख, शंकर काठे, महेंद्र बोरा, राजेंद्र ढगे, अनिल देशमुख, वसंत जाधव, मच्छिंद्र पवार, नरेंद्र पेलमहाले, नवनाथ नाठे, जयवंत जाधव, विजय बर्डे, अमोल देशमुख, डॉ. अनिल पवार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.