Kotwal Recruitment: अनेक वर्षे रेंगाळलेली कोतवाल भरती लवकरच! अनुकंपाधारकांना प्राधान्य देण्याची वारसांची मागणी

Recruitment
Recruitmentesakal
Updated on

Kotwal Recruitment : अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या तालुक्यातील कोतवाल भरतीचा मुहूर्त अखेर निघाला असून, १४ कोतवालांची पदे भरली जाणार आहेत. कोतवाल भरती झाल्यास महसूल विभागाच्या कामास गती येणार आहे. (Kotwal recruitment been lingering for many years coming soon Heirs demand preference for compassionate people nashik)

राज्यभरातील गावांमध्ये महसूल विभाग व शासनाच्या बहुतांश कामांची पूर्तता करण्यासाठी कोतवालपद महत्त्वाचे आहे. अनेक वर्षे कोतवालपदाची भरती व्हावी, अशी मागणी होत होती.

राज्य शासनाने तलाठी भरती प्रक्रिया सुरू केली असताना, कोतवाल भरती प्रक्रियेचे आरक्षण वेळापत्रक जाहीर झाले आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांच्या ८० टक्क्यांपर्यंत मर्यादित कोतवाल पदे भरली जाणार आहेत.

विशेष बाब म्हणून या भरतीला शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे लवकरच कोतवाल पदे भरली जाणार असून, महसूल विभागाच्या कामात सुसूत्रता व गतिमानता येईल आणि शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील, अशी आशा आहे.

दरम्यान, सजानुसार भरतीप्रक्रिया न घेता ती तालुका स्तरावर घ्यावी. यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना संधी मिळेल आणि गुणवत्तायुक्त विद्यार्थी भरती होतील, अशी मागणी होत आहे. तलाठ्यांनी सांगितलेली कामे, तसेच गौण खनिज देखरेख कोतवाल करतो.

कोतवालाची नेमणूक तहसीलदार करतात. प्रत्येक सजासाठी एक कोतवाल असतो. कोतवालाचे मानधन काही दिवसांत वाढले आहे. भारतात कोतवालपद मोगल कालखंडामध्ये गावातील प्रशासन चालविण्यासाठी निर्माण करण्यात आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कोतवाल पूर्णवेळ काम करणारा कनिष्ठ ग्रॅनोकर आहे व त्या संबंधित गावात राहणे बंधनकारक असते. तो गावातील २४ तास शासकीय सेवेस बांधिल असतो.

सुरवातीला कोतवाल पदासाठी वंशपरंपरा होती. मात्र, १९५९ पासून राज्यातील वंशपरंपरागत किंवा वतनी गावकामगारांची नियुक्ती रद्द करण्यात आली. सध्या महाराष्ट्रामध्ये १३ हजार ६३६ पेक्षा अधिक कोतवाल कार्यरत आहेत.

या गावांत होणार कोतवाल भरती

निफाड, कोठुरे, नारायणगाव, तळवाडे, चाटोरी, शिरवाडे वणी, कारसूळ, गोंदेगाव, धारणगाव वीर, डोंगरगाव, पिंपळगाव बसवंत, देवगाव, वाकद खेडलेझुंगे, ओणे, नांदूरमध्यमेश्वर, खानगाव थडी, तामसवाडी.

"कोतवाल भरतीत मृत्यू झालेल्या कोतवालांच्या वारसांना प्राधान्य द्यावे."

-संतोष त्र्यंबके, अध्यक्ष, कोतवाल संघटना, निफाड

"माझ्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने अनुकंपाधारकांना संधी दिल्यास मुलांच्या शिक्षणासह आयुष्याचाही प्रश्न मार्गी लागेल."

-निलोफर यामिन कादरी, निफाड

"शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोतवाल भरती केली जाणार असून, आरक्षणासंदर्भात माहिती प्रसिद्ध केली आहे." -शरद घोरपडे, तहसीलदार, निफाड

Recruitment
Nashik News: काट्या-कूट्याचा तुडवित रस्ता, गावाकडे चल माझ्या दोस्ता! डोंगरकुशीत शाळेचे रंगले वनभोजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()