Nashik Crime News : सिडको परिसरात भरवस्तीत रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास कोयतागँगने धिंगाणा घातला असून सुमारे वीस ते पंचवीस गाड्यांची तोड फोड केल्याने परिसरात भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
पोलीस प्रशासनाचा गावागुंडांवर वचकच राहिला नसल्याच्या संताप जनक प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत. (Koyta Gang has been damaged around 20 to 25 cars cidco nashik crime news)
शुक्रवारी रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास सिडको परिसरातील पवननगर पोलीस चौकी मागील सूर्यनारायण चौक, रायगड चौक अश्या परिसरात दोन दुचाकीवरील आलेल्या सहा ते सात गावगुंडांनी म्हणजेच कोयतागँग ने त्यांच्या हातातील कोयते, धारदार शत्रे व लाकडी दांड्यांच्या सह्याने जे वाहन दिसेल ते फोडण्यास सुरुवात केली.
अचानक घडलेल्या प्रकारमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले. तात्काळ घराचे दरवाजे बंद झाले.हे गावागुंड परिसरातून गेल्यानंतर नागरिक घरातून बाहेर आले.
बाहेर आल्यानंतर अनेकांच्या वाहनांच्या काचा फोडल्या, गाडीवर कोयत्याने मारहाण केल्याने कोचे पडले, रिक्षाच्या काचा फोडल्या. झालेले नुकसान बघूनही अनेकांनी पोलिसात तक्रार देणे टाळले.
आज तक्रार दिली तर हे गावगुंड पुन्हा येतील आणि आपला काट धरून आपल्याला पुन्हा मारहाण करतील या भीतीने अनेकांनी पोलीसात तक्रार देणेदेखील टाळले असल्याचे वास्तववादी चित्र समोर आले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सिडको परिसरात वाढती गुन्हेगारी लक्षात घेता ह्या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच शिल्लक राहिला नसल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत असून या गावगुंडांना राजकीय पाठबळ असल्याचे देखील नागरिकांमधून दबक्या आवाजाने बोलले जात आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्त यांनी आता सिडकोत जातीने लक्ष घालून या गावगुंड्यांचा कंबरड मोडायला पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. उन्हाळ्याचे दिवस असून नागरिक दहा साडेदहा वाजेच्या सुमारास घराबाहेर बसलेले असताना असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सिडकोत पुन्हा एकदा विविध गॅंग तयार होत असून वर्चस्ववादातून असे प्रकार वारंवार घडत तर नाही ना प्रश्न सिडकोवासियांमधून उपस्थित करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.