नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या (Kusumagraj Pratishthan) ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेअंतर्गत ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया (Brisbane, Australia) येथे २१ ग्रंथपेट्या नुकत्याच रवाना करण्यात आल्या. ब्रिस्बेन येथे वास्तव्यास असलेले श्रुती व तुषार काळवीट या दाम्पत्याने काही दिवसांपूर्वीच या योजनेचे प्रवर्तक विनायक रानडे यांची कुसुमाग्रज स्मारक (Kusumagraj Memorial) येथे भेट घेतली होती. (Kusumagraj Pratishthan granth tumchya daari books scheme Nashik News)
या वेळी संपूर्ण योजना समजावून घेत ब्रिस्बेन येथील मराठी वाचकांसाठी पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी पुढाकार घेतला. त्यांना प्रतिसाद म्हणून १६ कुटुंबांनी आर्थिक पाठबळ देऊन सक्रिय सहभाग नोंदवला. त्यामुळे काळवीट दांपत्यांच्या माध्यमातून २१ पेट्या ब्रिस्बेनसाठी रवाना करण्यात आल्या. विशेष म्हणजे, अंजली घुर्ये यांच्या ओ झेड किराणा या उद्योग समूहातर्फे त्यांच्या कंटेनरमधून या पेट्या पाठविण्यात आल्या. यापैकी प्रत्येक पेटीत वेगवेगळ्या प्रकारची २५ पुस्तके आहेत. ब्रिस्बेन येथील विविध भागात या पेट्या वाचक कुटुंबाला तीन महिन्यांसाठी उपलब्ध होतात.
त्यानंतर दर तीन महिन्यांनी या पेट्या परस्परांत बदलत्या ठेवल्यामुळे सर्वाना मोठ्या प्रमाणात दर्जेदार मराठी ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध होत राहाते. दरम्यान, ग्रंथ तुमच्या दारी या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत २ कोटी ५० लाख रुपयांची ग्रंथ संपदा देशाबाहेर पोचविण्यात आली असल्याचे या वेळी सांगण्यात आले. त्याचप्रमाणे कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेकांनी विविध प्रकारची पुस्तके भेट दिली असल्याचेही श्री. रानडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.