PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेंतर्गत अजूनही सुमारे सहा हजारांच्या आसपास शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण असल्याने दोन हजारांच्या सन्मान निधीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वास्तविक पाहता दुर्गम समजल्या जाणाऱ्या पेठ तालुक्यात तब्बल १०० टक्के केवायसी पूर्ण झाली आहे. (KYC of around 6 thousand farmers is incomplete in pm kisan yojana nashik news)
नाशिक जिल्ह्यात चार लाख ३२ हजार ४७० सन्मान निधीसाठी केवायसी पूर्ण आहे. पात्र असून त्यांच्या खात्यावर फेब्रुवारीअखेरीस १६व्या हप्त्याची रक्कम जमा होणार नाही, असे दिंडोरी तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील पात्र चार लाख ३९ हजार ३५६ पैकी अजूनही सहा हजार ८८६ शेतकऱ्यांनी केवायसी न केल्याने ते सन्मान निधीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ आपल्या बँक खात्याला आधारकार्ड जोडून केवायसी करावी, अन्यथा पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता मिळण्यापासून वंचित राहू शकता, असे विजय पाटील यांनी सांगितले.
तालुक्याची नावे व कंसात केवायसीची टक्केवारी अशी : दिंडोरी (९८), पेठ (१००), येवला (९८), सिन्नर (९९), सुरगाणा (९८), त्र्यंबकेश्वर (९९), कळवण (१००), निफाड (९९), बागलाण (१००), नाशिक (९८), नांदगाव (९८), मालेगाव (९८), इगतपुरी (९८), देवळा (९७), चांदवड (९८).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.