Nashik News : देवळा आरोग्य विभागात मनुष्यबळाची वानवा; रुग्णसेवेवर मर्यादा

Lack of manpower and lack of some physical facilities in deola Rural Hospital nashik news
Lack of manpower and lack of some physical facilities in deola Rural Hospital nashik newsesakal
Updated on

Nashik News : तालुक्यातील आरोग्य यंत्रणा व ग्रामीण रुग्णालय निरोगी स्थितीत असली तरी मनुष्यबळाची कमतरता व काही भौतिक सुविधांचा वानवा यामुळे रुग्णसेवा देताना अनंत अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आली आहे. (Lack of manpower and lack of some physical facilities in deola Rural Hospital nashik news)

अद्यावत रुग्णवाहिका, वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह इतरही काही तज्ज्ञ डॉक्टरांची व आरोग्यसेवक-सेविकांची कमतरता असल्याने रुग्णसेवेसाठी मर्यादा पडत आहे. त्यामुळे रिक्त पदे भरत आवश्यक सुविधा मिळाव्यात अशी मागणी होत आहे.

देवळा तालुक्यात आरोग्य विभागाने व देवळा ग्रामीण रुग्णालयाने कोरोना काळात मोठे काम केले असून वर्तमान स्थितीतही रुग्णसेवेचे व्रत चांगल्या पद्धतीने जोपासले जात आहे. परंतु तालुका आरोग्य विभागात जवळपास ३९ पदे रिक्त आहे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक पद रिक्त आहे.

अतिदक्षता विभागात एम.डी फिजिशियन, डायलिसिस केंद्रात डॉक्टरची आवश्यक गरज आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये वीजेची समस्या आहे. माजी आरोग्यमंत्री डॉ.दौलतराव आहेर व त्यांच्या बंधूंनी येथील ग्रामीण रुग्णालयाला मोफत जागा उपलब्ध करून देत मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले डायलिसिस सेंटर येथे मिळाले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Lack of manpower and lack of some physical facilities in deola Rural Hospital nashik news
Onion Crisis : उष्णतेने साठवलेला कांदा लागला सडू; कवडीमोल भावात विकायची वेळ!

त्यामुळे येथे रोज चार ते पाच तर महिन्याला ८८ रुग्णांचे डायलिसिस होत असते. उपचारासाठी आवश्‍यक असलेली सर्व यंत्रणा देवळा आरोग्य विभागात असूनही केवळ कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे तालुक्याची आरोग्य व्यवस्था काहीशी कमजोर पडत आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉ. योगेश आहिरे, बालरोगतज्ज्ञ डॉ.नीलेश पवार, भुलतज्ज्ञ डॉ.गणेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचा गाडा हाकत आहे.

देवळा आरोग्य विभागातील रिक्तपदे

आरोग्य सेवक - ४ पदे

आरोग्य सेविका -२७ पदे

आरोग्य सहायिका -४ पदे

प्रयोगशाळा तंत्रज्ञ - २

"ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवक-आरोग्यसेविका यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत. आवश्यक सोयी-सुविधा मिळाव्यात जेणेकरून रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील."- संभाजी आहेर, गटनेते नगरपंचायत देवळा

Lack of manpower and lack of some physical facilities in deola Rural Hospital nashik news
2000 Rupess Note : 2 हजाराच्या नोटा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या माथी; शेतकऱ्यांची कोंडी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.