Water Wastage : गळती झालेले पाणी थेट पोचले 4 किलोमीटर; लाखो लिटर पाणी मातीमोल!

Repair work in progress in the presence of Deputy Engineer Hemant Naik
Repair work in progress in the presence of Deputy Engineer Hemant Naik esakal
Updated on

Nashik News : रविवारी (ता.२१) पहाटे साडेतीन वाजता प्रभाग क्रमांक ३० मधील राजीवनगरच्या वैभव कॉलनीजवळील चड्डा पार्क येथील टाकी भरण्यासाठीचे असलेले ४५० मिमी व्यासाचे पाइप बेन्ड फिटिंगमधून सुटे झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. (Lakhs of liters of water was wasted when the 450 mm diameter pipe came loose from bend fitting nashik news)

वाया जाणारे पाणी जवळपास मुंबई नाक्यापर्यंत म्हणजे सुमारे चार किलोमीटरपर्यंत सकाळी नऊपर्यंत वाहत होते, यावरून या गळतीचा अंदाज येईल. उपअभियंता हेमंत नाईक यांच्या उपस्थितीत युद्धपातळीवर नव्याने ही दुरुस्ती करण्यात आली.

शनिवारी (ता. २०) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे हे महाकाय पाइप जोडणारे आणि जीर्ण झालेले बेन्ड बदलण्यात आले. रविवारी पहाटे अडीच वाजता पाथर्डी फाटा येथून ही टाकी भरण्यासाठी पंपिंग सुरू झाले.

१२० हॉर्स पॉवरच्या पंपाद्वारे हे पंपिंग सुरू झाले. मात्र या दरम्यान असणाऱ्या एअर व्हॉल्व्हने काम करणे बंद केले आणि कमालीचा दाब वाढला. त्यामुळे नव्याने बसवण्यात आलेल्या बेन्डमधून हे पाइप निखळले आणि हे सर्व पाणी रस्त्यावर वाहू लागले. एक तासानंतर ही बाब पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पाथर्डी फाटा येथील पंपिंगला कळविले आणि त्यांनी पंपिंग बंद केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Repair work in progress in the presence of Deputy Engineer Hemant Naik
Raj Thackeray: काम करायचं नसेल तर पदं सोडा; राज ठाकरे संतापले

तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले होते. शिवाय या मोठ्या व्यासाच्या पाईपमध्ये असलेले पाणी वाया जातच होते. या पाण्याने परिसरातील मोकळे भूखंड तुडुंब भरले. त्यानंतर हे पाणी चड्डा पेट्रोलपंपापासून लेखानगर जवळील स्पेस हॉटेलजवळून उड्डाणपुलाखालून सिडकोच्या बाजूला वळले. तेथून बालभारती, भुजबळ फार्म चौक, गोविंदनगर सत्यम स्वीट्सपासून मुंबई नाक्यापर्यंत वाहत होते. त्या भागातील अनेक वाहन धारक नेमके पाणी वाहतेय कुठून हे शोधण्यासाठी उलटा प्रवास करत प्रशासनाला लाखोली वाहत होते.

सकाळी साडेसात वाजता उपअभियंता नाईक, ठेकेदार शशिकांत श्रीवास्तव आणि मोठी टीम पुन्हा या ठिकाणी आली. रविवार असल्याने साहित्य मिळविण्यास अडचणी येत होत्या. मात्र, नादुरुस्त झालेले बेन्ड, व्हॉल्व्ह आदी साहित्य उपलब्ध करण्यात आले.

युद्धपातळीवर मग ही दुरुस्ती करण्यात आली. रविवारी पंपिंग सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान बऱ्याचशा भागात पाणी वितरित झाले होते. राहिलेल्या भागात इतर ठिकाणाहून व्यवस्था करून कमी प्रमाणात का असेना पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू होते.

Repair work in progress in the presence of Deputy Engineer Hemant Naik
Onion Rate News : कांदा भावामुळे शेतकऱ्यांत असंतोष; आंदोलनांचे भडके

एकीकडे लाखो लिटर पाणी वाया जात असताना गेल्या अनेक दिवसांपासून राजीवनगर, राणेनगर, चेतनानगर, सदिच्छानगर, इंदिरानगर परिसरात लोकांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी गॅस पाइपलाइन खोदून ठेवल्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची गळती सुरू आहे. मात्र महापालिकेचे या ठिकाणी सपशेल दुर्लक्ष झाले आहे.

मागील आठवड्यात गॅस पाइपलाइन कामामुळे पाथर्डी फाटा येथील दामोदर चौकातील स्वामी नारायण हाईट्स येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. लोकांना रात्री बारापर्यंत पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागते. खासगी टँकरद्वारे पाणी घ्यावे लागते.

पाण्याची गळती थांबवत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा अन्यथा शिवसेनेतर्फे (ठाकरे गट) आंदोलन केले जाईल, असा इशारा उपमहानगरप्रमुख नीलेश साळुंखे, विभागप्रमुख रवींद्र गामणे, विभाग संघटक किरण शिंदे, उपविभागप्रमुख मदन डेमसे, आकाश काळे, सागर देशमुख, आकाश कदम, शाखाप्रमुख साईनाथ घुले, रवी अर्धापुरे, गणेश फाजगे, मोहन हिवाळे, करण साळवे, दिनेश थोरात आदींनी दिला आहे.

Repair work in progress in the presence of Deputy Engineer Hemant Naik
MSRTC News : मालेगावची बस गुजरातच्या जंगलात बंद पडली!

"ऐन उन्हाळ्यात वाया जाणारे पाणी बघणे क्लेशदायक आहे. शिवसेनेच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सातत्याने उठवला जात आहे. रस्त्यावर पाणी वाहते तरी अधिकारी आणि कर्मचारी सुस्त आहेत. नागरिकांकडे त्यांना बघायला वेळ नाही. अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, याला सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार आहे." - नीलेश साळुंखे, उपमहानगरप्रमुख, शिवसेना ठाकरे गट

"खबरदारी म्हणून जीर्ण झालेले बेन्ड शनिवारी (ता. २०) बदलण्यात आले. मात्र, टाकी भरताना पाइप दरम्यानचा व्हॉल्व्ह तांत्रिकदृष्ट्या नादुरुस्त झाल्याने अतिदाबाने मोठ्या व्यासाचे पाइप निखळले आणि पाणी गळती झाली. पुन्हा सर्व दुरुस्ती करण्यात आली आहे." - हेमंत नाईक, उपअभियंता, मन

Repair work in progress in the presence of Deputy Engineer Hemant Naik
Nashik News : अखेर मालेगावात पकडलेल्या 'त्या' 53 उंटांची झाली घरवापासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()