Nashik News: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लाखो पावांची विक्री! सरत्या वर्षाला निरोप देताना मालेगावला सणाचे वातावरण

शहरासह ग्रामीण भागात गल्ली मोहल्ल्यातून पावविक्रीच्या हातगाड्या फिरत होत्या. त्यामुळे पावच्या विक्रीत दुप्पटीने वाढ झाली.
Bakery Products
Bakery Productsesakal
Updated on

मालेगाव : सरत्या वर्षाला निरोप देताना येथे बेकरी व पाव विक्रीची दुकाने हाऊसफुल्ल झाली. शहरासह ग्रामीण भागात गल्ली मोहल्ल्यातून पावविक्रीच्या हातगाड्या फिरत होत्या. त्यामुळे पावच्या विक्रीत दुप्पटीने वाढ झाली.

सरत्या वर्षाला निरोप देताना सणासुदीसारखे वातावरण होते. दिवसभर मटण, चिकनच्या दुकानांवर ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होती.

नवीन वर्षाच्या आनंद घेण्यासाठी अनेक जण कुटूंबियांना सोबत हॉटेल, कॉलेज मैदान यासह विविध ठिकाणी आनंद घेत आहे. यातच रविवारची सुट्टी लागून आल्याने सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला आहे. (Lakhs of Pav ladi sold on New Years eve festive atmosphere in Malegaon while bidding farewell to new year Nashik News)

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी प्रत्येक जणांनी नियोजन केले होते. त्यानुसार बेकरी व्यवसायिकांनी देखील जादा पाव तयार केले होते. नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध चौकात पाव विक्री करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले होते.

शहरातून ग्रामीण भागातील काही व्यावसायिकांनी पाव विक्रीसाठी आणले होते. येथील एकात्मता चौक, रावळगाव नाका, सटाणा नाका, किदवाई रोड, मोहम्मद अली रोड, मौसम पूल, मोची कॉर्नर यासह विविध भागात पावची दुकाने लागली आहे.

येथे दहा बेकरीत पाव बनविले जात आहे. रविवारी येथे दिवसभरातून सुमारे लाखाच्यावर पावची विक्री झाली. वीस ते तीस रुपये डझनने पावची विक्री होत होती. रमजाननंतर येथे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाव तयार केले जात असल्याचे येथील बेकरी व्यावसायिकांनी सांगितले आहे.

Bakery Products
Happy New Year 2024: दुःख,संकटे विसरू, नव्या वर्षांत नव्याने उभे राहू! अपेक्षा ठेवत 2024चे जल्लोषात स्वागत

घराघरांत पावभाजीचा बेत

सामान्य नागरिक नवीन वर्षाच्या आनंद मोठ्या जल्लोषात साजरा करीत आहे. त्यामुळे पूर्व व पश्चिम तसेच ग्रामीण भागातील अनेक घरात पाव भाजी बनविली जात आहे. शहरांतील पावभाजी बनविणाऱ्या हातगाड्यावर नागरिकांची गर्दी दिसून आली.

"शहरात यंदा मोठ्या प्रमाणात पावची विक्री होत आहे. व्यवसायिकांची दोन ते तीन दिवसांपासून जादा प्रमाणात पाव बनविण्यासाठी लगबग सुरू केली होती."

- हबीब शेख, नवाब बेकरीचे संचालक, मालेगाव.

Bakery Products
Happy New Year 2024 : संपूर्ण वर्षभर राहाल मालामाल; नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करा हे उपाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.