Chandanpuri Divtya-Budhlya: श्रीक्षेत्र चंदनपुरीत लाखोंची उलाढाल; दिवट्या-बुधल्यांमुळे स्थानिकांना रोजगार

A specially designed shed for the devotees
A specially designed shed for the devoteesesakal
Updated on

Chandanpuri Divtya-Budhlya : महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेरायाचे जेजुरीपाठोपाठ श्रीक्षेत्र चंदनपुरीचा लौकिक वाढत आहे. पौष पौर्णिमेच्या यात्रोत्सवापाठोपाठ, चंदनपुरीत दरवर्षी विवाह तिथींअगोदर होणाऱ्या दिवट्याबुधल्यांमुळे येथील अर्थकारणाला चालना मिळाली.

शुक्रवार ते रविवार तीन दिवसात दिवट्या बुधल्यांचा धडाका असतो. रविवारी शंभरहून अधिक दिवट्या बुधल्यांमुळे ५० लाखांची उलाढाल होते. आठवड्यात ही उलाढाल ७५ लाखापर्यंत जाते. यामुळे येथील अर्थकारणाला चालना मिळाली आहे. (Lakhs turnover in Srikshetra Chandanpuri Employment to locals due to lights nashik news)

विवाह समारंभापूर्वी एक महिना ते पंधरा दिवस अगोदर दिवट्या बुधल्या केल्या जातात. संख्येनिहाय ठोक पद्धतीने प्रतिताट दीडशे ते दोनशे रुपये प्रमाणे मटणाचे जेवण दिले जाते.

दिवट्याबुधल्यांमुळे वाघ्या मुरळी, आचारी, वाढपी, जार व्यावसायिक, खाटीक, किरकोळ विक्रेते, शेड व जागा मालक आदींसह शेकडोंना पूरक रोजगार मिळाला आहे. दिवट्याबुधल्यांमुळे दर रविवारी सुमारे ५० लाखांची तर आठवड्यातून पूरक व्यवसायांसह एक कोटींची उलाढाल होते.

दशकापूर्वी दिवट्याबुधल्या वरपिता मुळ गावी करत. संपूर्ण गाव पंक्तीमुळे दहा ते पंधरा बोकडबळी देऊनही शेवटच्या पंगतीला जेवण पुरत नसे. त्यावर उपाय म्हणून चंदनपुरीला खंडेरावचरणी दिवट्या बुधल्यांची परंपरा सुरु झाली.

संपूर्ण कुटुंबाऐवजी घरातील एका सदस्याला निमंत्रण देतात. भाऊबंदकी पूर्ण असते. यामुळे खर्चात बचत, धावपळीच्या युगात कमी वेळ, कमी श्रम व कमी खर्चात कार्यक्रम होतो. दिवट्या बुधल्यांसाठी चंदनपुरीत ७५ हून अधिक शेड आहेत.

१५ बाय २५ आकाराच्या जागेसाठी दीड हजार रुपयापासून ते पाच हजार रुपयापर्यंत भाडे आकारतात. ग्रामपंचायतीची पाच शेड असून प्रत्येकी दीड हजार रुपये शुल्क आकारतात. पाच हजार रुपये दिल्यास भांडी, आचारी उपलब्ध होतो. दहा ते पंधरा आचारी, पाच जार व्यावसायिक आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

A specially designed shed for the devotees
Unseasonal Rain : कळवण तालुक्यात पंधराशे हेक्टरवर नुकसान; शेतकरी चिंताग्रस्त

यासाठी केल्या जातात दिवट्या बुधल्या

विवाहसोहळा निर्विघ्नपणे पार पडावा. कुलदैवत व दैत्यांना नैवेद्यासाठी विभाग, प्रांतनिहाय वेगवेगळे कार्यक्रम होतात. कसमादेत दिवट्या बुधल्यांची प्रथा आहे. दिवट्या बुधल्यांनिमित्त बोकड बळी देऊन नैवेद्य दाखविल्यानंतर आप्तेष्ट, भाऊबंदांना कुलदैवताला विवाह सोहळ्याचे आमंत्रण देतात.

दैत्यांना नैवेद्य दाखवून विवाहसोहळ्यापूर्वी जागरण गोंधळ करतात. जागरण गोंधळात वाघ्या मुरळी रात्रभर देवाची गाणी गातात. यासाठी वाघ्या मुरळींना साडेसात हजार ते अकरा हजार रुपयांपर्यंत रक्कम दिली जाते.

कसमादे वगळता अन्य भागात याला ‘कंदुरी’ अथवा ‘कारल्याचे जेवण’ संबोधतात. नगर भागात याच कार्यक्रमाला ‘गडंगनेर’ म्हणतात. जळगाव, धुळेकडे भाऊबंदांकरिता होणाऱ्या या कार्यक्रमाला ‘घुगरविणे’ म्हणतात.

येथे पुरणपोळी (मांडे), खीर-भात नैवेद्य असतो. काही कुटुंबीय भरीत-रोडगे करतात. काही भागात कारले, मेथी भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवितात. अंतापुरला (ता. बागलाण) सातत्याने कंदुरीचे कार्यक्रम होतात.

वाघ्या मुरळींना मान

दिवट्याबुधल्यांनिमित्त कोटम, तळी भरणे, लंगर तोडणे आदी कार्यक्रम वाघ्या मुरळी करतात. तळी भरण्यासाठी ५०१ रुपये, कोटमसाठी ७५१, लंगर तोडण्यासाठी २१०० रुपये, रात्रभर जागरण गोंधळासाठी साडेसात हजार ते अकरा हजार रुपये.

बोकडबळी दिल्यानंतर खंडेरायाला व बाणुबाईला मेथी-भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. बोकड मारण्याचा लिलाव ट्रस्टमार्फत होतो. त्यातून ट्रस्टला पाच ते साडेपाच लाख रुपये उत्पन्न मिळते.

"विवाहसोहळा निर्विघ्नपणे पार पडावा. कुलदैवतासह आपापल्या भागातील दैत्यांना नैवेद्य द्यावा. तसेच नवसपूर्तीसाठी पिढ्यानपिढ्या रुढीपरंपरेनुसार हा कार्यक्रम होतो. प्रत्यक्षात देवाला व बाणाईला मेथी-भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. चतुर्थी, एकादशी, संकष्टी, महाशिवरात्र, आषाढी, हनुमान व राम जन्मोत्सव यासह प्रमुख धार्मिक उत्सवावेळी दिवट्याबुधल्या करत नाहीत. दिवट्या बुधल्या गोड व तिखट दोन्ही पद्धतीने केल्या जातात."

- माणिक महाराज, श्रीक्षेत्र चंदनपुर

A specially designed shed for the devotees
Nashik News: साखर कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त; राज्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पादनात 20 टक्क्याने घट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.