Lalit Patil Drug Case: MD ड्रग्जचा प्रवास मुंबई व्हाया नाशिकमध्ये! सामनगाव गुन्ह्यात आणखी एकाला मुंबईतून अटक

Lalit Patil Drug Case
Lalit Patil Drug Caseesakal
Updated on

Nashik Drug Case : शिंदेगावात एमडी ड्रगजचा कारखाना सापडला असला तरी, सामनगाव, वडाळागावात सापडलेले एमडी ड्रग्ज हे मुंबईतून नाशिकमध्ये आणले जात असल्याचे आत्तापर्यंतच्या पोलीस तपासातून समोर येते आहे.

दोन दिवसांपूर्वी छोट्या भाभीला एमडीचा पुरवठा करणार्यास मुंब्र्यातून (ठाणे) अटक केली तर, सामनगाव प्रकरणातही आणखी एका संशयिताला नाशिक पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे.

त्यामुळे आत्तापर्यंतच्या तपासानुसार, नाशिकमध्ये एमडीचा कारखाना असला तरी, त्याची विक्री मुंबईमार्गेच नाशिकला होत असल्याचे समोर येते आहे. (MD Drugs travel to Nashik via Mumbai One more arrested from Mumbai in Samangaon crime)

भूषण उर्फ राजा गणपत मोरे (३६, रा. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गेल्या ७ सप्टेंबर रोजी सामनगाव येथे अंमली पदार्थविरोधी पथकाने एकाकडून १२.५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केली होती.

याप्रकरणी आत्तापर्यंत आठ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. यात गणेश संजय शर्मा, गोविंद साबळे, आतिष उर्फ गुड्य्या शांताराम चौधरी, अर्जून सुरेश पिवाल, सनी अरुण पगारे, सुमीत अरुण पगारे, मनोज उर्फ मन्ना भरत गांगुर्डे यांना अटक केली.

यातील संशयित पगारे बंधू, गांगुर्डे व पिवाल हे एमडी ड्रग्ज मुंबईतून आणत असल्याचे समोर येताच, अंमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या पथकाने सखोल तपास करीत मुंबईतून संशयित भूषण मोरे यास अटक केली आहे.

त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यास सोमवारी (ता.२३) न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.

दोन दिवसांपूर्वी, वडाळागावातील एमडी कारवाईप्रकरणात छोट्या भाभीचा पती इंमितयाज शेख याला एमडीचा पुरवठा करणाऱ्या सलमान फाळके यास नाशिक पोलिसांनी मुंब्र्यातून (ठाणे) अटक केली आहे.

Lalit Patil Drug Case
Lalit Patil Drug Case : निवडणुकीच्या केंद्रस्थानी ड्रग्ज! दोन्ही सेनेत ललित पाटीलच्या प्रवेशावरून जुंपणार

ललितच्या कोठडीत वाढ

चेन्नईतून अटक करण्यात आलेल्या ललित पाटील उर्फ पानपाटील यास मुंबई पोलिसांनी अंधेरी न्यायालयात हजर केले असता, त्यास येत्या २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी एमडी ड्रग्जचे साठे सापडत आहे,

त्याच्याशी ललितचा काही संबंध आहे का, तसेच ललित व त्याच्या सहकार्यांनी आणखी एमडीचा साठा करून ठेवला आहे का, याबाबतची चौकशीसाठी ललितच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.

तसेच, ललितचा भाऊ भूषण व त्याचे सहकारी यांच्यातील ड्रग्जच्या व्यवसायातील आर्थिक व्यवहाराची चौकशी केली जाण्याची शक्यता होती.

लोहारेकडे एमडीचा फॉर्मूला

केमीकल इंजिनिअयर असलेला अरविंद लोहारे यास पुणे पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याच माध्यमातून ललित एमडी ड्रग्जच्या व्यवसायात आला. त्यांची ओळख येरवडा कारागृहात झाली होती.

ललितच्या सांगण्यावरून लोहारे याने संशयित हरिश पंत याला एमडी बनविण्याचे प्रशिक्षण दिले. लोहारे यास रविवारी (ता.२२) पुणे न्यायालयात हजर केले असता, त्यास २५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

Lalit Patil Drug Case
Lalit Patil Drugs Case: ललित पाटीलचा आणखी एक कारनामा आला समोर, जेलमधून रुग्णालयात जाण्यासाठी केला ड्रामा? VIDEO

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.