Lalit Patil Drug Case: ललित पाटीलचा हॉटेलवर महिन्याला 17 लाख रुपये खर्च; पोलिस तपासातून उघड

Lalit Patil Drug Case
Lalit Patil Drug Caseesakal
Updated on

Lalit Patil Drug Case: ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला ललित पाटील दर महिन्याला हॉटेलवर १७ लाख रुपये खर्च करीत असल्याची बाब पोलिस तपासातून उघडकीस आली आहे.

(Lalit Patil used to spend Rs 17 lakh on hotels every month drug case nashik news)

ससून रुग्णालयात तो ‘ॲडमिट’ असला, तरी हॉटेलमध्ये त्याच्यासाठी वर्षभराची रूम बुक ठेवण्यात येत असल्याचेही या तपसातून पुढे आले. ड्रग्जच्या पैशांची तो अशा पद्धतीने उधळपट्टी करीत असल्याचे कारनामे समोर येत आहेत.

येरवडा कारागृहातील तीन वर्षांच्या काळात ललित पाटील तब्बल नऊ महिने ससून रुग्णालयात राहिला. त्याला मैत्रिणी भेटण्यासाठी आल्यावर तो रुग्णालयातून हॉटेलमध्ये जायचा. हॉटेलमध्ये त्याची एक खोली नेहमी बुक होती.

एका कैद्यास इतक्या सुविधा कशा मिळाल्या, हा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर पोलिसांच्या तपासातून मिळाले आहे. या सर्व सुविधांसाठी ललित पाटील तब्बल १७ लाख रुपये महिन्याला देत होता.

Lalit Patil Drug Case
Lalit Patil Drug Case: ललित पाटीलकडून 3 किलो साेने जप्त; पुणे पोलिसांकडून नाशिकमध्ये कसून चौकशी

पुण्यातील १६ नंबर वॉर्डात ड्यूटीवर असलेल्या पोलिसांचे हात ‘ओले’ करून तो हे सर्व चालवत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

पोलिस कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता

ललित पाटील कैदी असतानाही इनोव्हा कार घेऊन बिनधास्तपणे फिरत होता. मॉल, हॉटेलमध्ये खरेदी करायचा. त्याला मदत करणारे पोलिस कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात दहापेक्षा जास्त पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे निलंबन झाले. परंतु, बडतर्फीची कारवाई अजून कोणावर झालेली नाही.

Lalit Patil Drug Case
Lalit Patil MD Drug Case: ड्रग्जमधून कमावलेला काळा पैसा गेला कुठे? नोंदणी महानिरीक्षकांकडील तपशिलाची प्रतिक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.