Nashik News : नानावली आणि वडाळागाव येथील मुस्लिम कब्रस्तानसाठी आरक्षित असलेल्या जागेसंदर्भात भूसंपादन प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
नानावली आणि वडाळागाव येथील मुस्लिम कब्रस्तानसाठी आरक्षित असलेली जागा मुस्लिम समाजाच्या ताब्यात देण्यात यावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे करण्यात आली होती. २०२१ मध्ये स्थायी समिती त्यास मंजुरी देखील देण्यात आली होती. (land acquisition proposal regarding land reserved for Muslim cemetery was placed before Standing Committee nashik news)
परंतु काही संघटनांनी विरोध केल्याने प्रस्ताव रद्द करण्यात आला होता. त्यानंतर ब्रिगेडचे अध्यक्ष अजित पठाण यांनी महापालिकेस निवेदन दिले होते. उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. २ मे २०२३ रोजी महापालिका मुख्यालयासमोर मुस्लिम बांधवांसह एकदिवसीय उपोषण करण्यात आले होते.
विविध सामाजिक संघटनांनी यात सहभाग घेतला होता. त्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने श्री. पठाण यांनी महापालिकेस माहितीचा अधिकाराच्या माध्यमातून मागण्यासाठी देण्यात आलेल्या निवेदनाबाबत झालेल्या कारवाईची माहिती मागितली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शुक्रवार (ता.२८) रोजी महापालिका जनमाहिती अधिकारी तथा उपअभियंता (भूसंपादन विभाग) यांच्याकडून विचारलेल्या प्रश्नांचे लेखी स्वरूपात उत्तर देण्यात आले आहे.
सदर जागेचे भूसंपादन करणे कामी स्थायी समितीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव ठेवण्यात आले आहे. प्रस्ताव कार्यान्वित असल्याचे पत्रकात सांगण्यात आले आहे. आता स्थायी समितीकडून कुठला निर्णय घेण्यात येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.