सूर्याची नावे धारण केलेल्या ‘तिकडी’चा बेकायदेशीर प्रताप

fraud
fraudesakal
Updated on

नाशिक : इनामी जमिनीवर डल्ला मारून करोडो रुपयांची कमाई करणाऱ्या भूमाफियांनी गोरगरिबांना फसवून जमिनी विकल्या. त्यातील नोटरीदेखील बोगस असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ‘दिनकर, रवी, पवन’ ही सूर्याची नावे धारण केलेल्या माजी नगरसेवकांनी व माजी नगरसेविकेच्या पतीने केलेल्या चुकीच्या व्यवहारांची शासनाकडून अद्यापही दखल घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दसक शिवारातील टाकळी मलनिस्सारण केंद्रासमोर श्री तिरुपती बालाजी नावाने भव्यदिव्य नगरी उभी राहात असली तरी यातील बहुतेक नगरी अनधिकृत असल्याची बाब समोर येत आहे. सर्व्हे क्रमांक ७८, ७९ मध्ये इनामी जमिनीवर नगर उभे राहात आहे. तेथील जमिनी शासनाने इनाम म्हणून दिल्या आहेत. इनामी जमिनीवर व्यवहार करायचे असल्यास शासनाची परवानगी लागते. इनामी जमिनीचा व्यवहार करण्यासाठी शासन परवानगी देते; परंतु त्यासाठी शासनाकडे नजराणा भरावा लागतो. तो नजराणा जवळपास बाजारभावाच्या आसपास असतो.

तसाच शिवारातील जमिनीचा व्यवहार बेकायदेशीर झाला आहे. शासनाचा नजराणा न भरता, शिवाय खरेदी न करता स्टॅम्प ड्यूटीदेखील बुडविली आहे. पाठोपाठ आणि जमिनीवर अनधिकृत बांधकामे केल्याने महापालिकेचे विकास शुल्कदेखील बुडाले. विशेष म्हणजे सूर्याची नावे धारण केलेल्या माजी नगरसेवक व नगरसेविकेच्या पतीने अनधिकृत नगरामध्ये पायाभूत सुविधा पुरवून महापालिकेला आणखीन खड्ड्यात घातले. एवढे बेकायदेशीर प्रताप करून पुढे आता नोटरीदेखील बोगस असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

प्रकरणाची व्याप्ती नाशिकपासून मुंबईपर्यंत

दसक शिवारातील सर्व्हे क्रमांक ७८, ७९ मध्ये जमिनीचे नियमित व्यवहार होणे अपेक्षित होते. नियमातील पळवाटा शोधून नियमित व्यवहार झाले असतील, तर नजरांना भरण्यासाठी खरेदीखत तयार करावे लागले असते. मात्र तसे न करता नोटरीने व्यवहार केले गेले. आता मात्र त्यानंतरदेखील बोगस असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याने एकूणच या प्रकरणाची व्याप्ती नाशिकपासून मुंबईपर्यंत असल्याची चर्चा आहे.

fraud
व्हॉट्स अपवर मेसेज टाकून ज्येष्ठ वकिलाला घातला गंडा

"माजी नगरसेवक दिनकर आढाव, माजी नगरसेवक पवन पवार, रवी पगारे, विलासराज गायकवाड, दीपक सदाकळे, रवी लोखंडे या भूमाफियांनी आमच्या जमिनी हडप करून परस्पर विकल्या. न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे. तरी सर्वच शासकीय यंत्रणा या भूमाफियांना पाठीशी घालून अतिक्रमण पाडण्यास अनेक दिवसांपासून टाळाटाळ करीत आहे. महापालिकेतील अधिकारी या लोकांना पाठीशी घालत असून, न्याय कोणाकडे मागायचा हाच प्रश्न पडला आहे."

-आनंद गांगुर्डे, पीडित

"पवन पवार, दिनकर आढाव, दीपक सदाकळे आणि विलासराज गायकवाड हे जमिनीचे मालक नसताना यांनी आमच्या जमिनी परस्पर लोकांना विकल्या आहेत. शिवाय लाखो रुपये नोटरी करून जागेच्या बदल्यात लोकांकडून घेतले आहे. आयकर विभागांसह सरकारच्या सर्व यंत्रणांचा करोडो रुपयांचा महसूल बुडविला आहे. अशा भूमाफियांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न पडला असून, महापालिका अतिक्रमण कारवाईला टाळाटाळ करीत आहे."

-सीमा गांगुर्डे, पीडित

fraud
बनावट कागदपत्रांद्वारे महिलेकडून व्यापाऱ्यांची फसवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.