Nashik News : बाप्पा चौकात 10 दिवसांपासून लॅन्डलाईन, इंटरनेट सेवा ठप्प!

No Network
No Networkesakal
Updated on

इंदिरानगर (जि. नाशिक) : येथील रथचक्र चौक परिसरात सुरू असलेले पावसाळी गटारीच्या कामाच्या संथपणाचा आता बीएसएनएल ग्राहकांनादेखील फटका बसला आहे.

या कामाच्या खोदकामात फोन केबल नादुरुस्त झाल्याने गेल्या दहा दिवसांपासून या भागातील अनेक घरांची लॅन्डलाईन सेवा आणि त्यावर अवलंबून असणारी इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. (Landline internet service stopped for 10 days in Bappa Chowk Nashik News)

या भागात विशेषतः निवृत्त नागरिक राहतात. त्यामुळे त्यांचे मोठे हाल होत आहेत. बाप्पा चौक, सत्यम सोसायटी नं.२ या भागातील फोन व इंटरनेट बंद आहे. नागरिकांनी ऑनलाईन तक्रार केल्या, परंतु उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

तीन माणसेच खोदकाम दुरुस्तीसाठी आहेत व ते कॅनडा कॉर्नर येथे आहेत, अशी उत्तरे मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान पावसाळी गटारीचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या लोकांनी वायर तोडल्यानंतर लगेच बीएसएनला कळवले होते, असे नागरिक सांगतात.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

No Network
PM Svanidhi Yojana : अडीच हजार लाभार्थ्यांना कर्जवाटप; तिसऱ्या टप्प्यातील कर्जासाठी अर्ज करा

तरीदेखील १० दिवस काहीही हालचाल नसल्याने नागरिकांचा संताप झाला आहे. साधारण 14 फेब्रुवारीपासून येथे पावसाळी गटारीचे काम सुरू झाले. मजुरांना ठेकेदाराने इत्थंभूत सूचना दिल्या तरीदेखील सुरवातीला ड्रेनेजलाइन फुटली आणि एकच दुर्गंधी पसरली.

ती दुरुस्त करत नाही इतक्यात विजेच्या केबल काम करणाऱ्यांनी तोडल्या. दोन दिवस या भागातील नागरिक अंधारात राहिले. यामुळे मूळ काम बाजूलाच राहिले, मात्र इतर सुविधा पुन्हा दुरुस्त करण्यात वेळ जात असल्याने संबंधित ठेकेदारदेखील वैतागले आहेत.

No Network
Weather Forecast : जिल्ह्यात पुन्हा वादळी अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला अलर्ट!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.