Nashik Landslide Alert : कळवण तालुक्यात 30 ठिकाणी भूस्खलनाचा धोका; कुटुंबे स्थलांतरित करण्याचे प्रशासनास आदेश

Landslide risk at 30 places in Kalwan taluka nashik news
Landslide risk at 30 places in Kalwan taluka nashik newsesakal
Updated on

Nashik Landslide Alert : तालुक्यातील ३० ठिकाणी भूस्खलनाचा धोका असल्याने इर्शाळवाडी (जि.रायगड) प्रमाणे या ठिकाणी विपरीत घडण्या आधीच खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन सतर्क झाले असून तालुक्यातील धोकादायक ठिकाणे निश्चित करून आवश्यकतेनुसार तेथील कुटुंब स्थलांतरित करावे, असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून तहसीलदारांना दिले आहेत. (Landslide risk at 30 places in Kalwan taluka nashik news)

कळवण तालुक्यातील सप्तशृंगगड, तातीनपाडा, जमाळे, कोसुरडे, भावकुर्डे, देसगाव, खर्डे दिगर, उंबरगव्हान, देवळी, वणी, नांदूर, धोडप माची, पायरपाडा आदी गावांना असल्याचे सांगितले जात आहे. इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात सुमारे २६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेचे गांभीर्य विचारात घेता नाशिक जिल्हा प्रशासनाने देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालानुसार नाशिक, पेठ, दिंडोरी व कळवण या चार तालुक्यांमधील ४३ गावे आणि पाड्यांना भूस्खलनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यात एकट्या कळवण तालुक्यातील ३० ठिकाणांचा समावेश आहे.

याशिवाय त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा या तालुक्यांनाही लॅण्डस्लाईडचा धोका संभवतो. भूस्खलनाचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांना भूस्खलनाची ठिकाणे निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Landslide risk at 30 places in Kalwan taluka nashik news
Irshalwadi Landslide: "इर्शाळवाडीतील मृतांची संख्या तीन आकडी असू शकते"; गिरीश महाजन सांगितला ग्राऊंड रिपोर्ट

तसेच पावसाचा जोर वाढल्यास संबंधित ठिकाणच्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशा नागरिकांसाठी तात्पुरत्या निवारागृहासाठी सामाजिक सभागृहे, मंदिर, शाळा आदी ठिकाणे राखीव ठेवावी, अशा सूचना प्रशासनाने तहसीलदारांना दिल्या आहेत.

दरम्यान नाशिक जिल्ह्यात जुलैचा तिसरा आठवडा संपुष्टात आला असताना अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे तूर्तास भूस्खलनाचा धोका असलेल्या भागातील नागरिकांची स्थलांतर करण्यात आलेले नाही. मात्र पावसाचा जोर वाढल्यास तातडीने पाऊले उचलली जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सप्तश्रृंगी गडावर दरड कोसळण्याची शक्यता

इर्शाळवाडी सारखी दुर्घटना सप्तश्रृंगी गडावर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गडावरील पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला दगडी संरक्षक भिंत उभारण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. गडाच्या पायथ्याशी संपूर्ण गाव वसलेले असल्याने तत्काळ संरक्षक भिंत उभारावी अशी मागणी १९ जुलै रोजी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Landslide risk at 30 places in Kalwan taluka nashik news
Saptashrungi Devi Gad : इर्शाळवाडीच्या घटनेने सप्तशृंगगडावर चिंतेचे वातावरण; धोकेदायक भागाबाबत नागरिक भयभीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.