Nashik : पाम तेलापासून बनणाऱ्या वस्तूंच्या दरात मोठी दरवाढ

Daily Essentials
Daily Essentialsesakal
Updated on

एकलहरे (जि. नाशिक) : एकीकडे पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना गॅस सिलिंडरने हजारी ओलांडली आहे. त्यात आणखी भर म्हणजे इंडोनेशियातून आयात होणाऱ्या पाम तेल न पाठविण्याच्या धोरणामुळे पाम तेलापासून बनणाऱ्या वस्तूच्या दरात मोठी दरवाढ सातत्याने सुरूच आहे. (Large rise in prices of products made from palm oil Nashik News)

पाम तेलाचा वापर साबण, फरसाण, बिस्कीट व तत्सम वस्तू बनविण्यासाठी होतो.

बिस्कीटमध्ये २. ५ ते ५ टक्के वाढ झाली आहे. साबणाच्या दरात गेले ३ महिन्यांपासून दरवाढ सातत्याने सुरू आहे. १४ रुपयांत मिळणारा साबण २४ वर गेला आहे. अंघोळीच्या साबणामध्ये लक्स ९६ रुपयांचा गट्टू १६० रुपये, संतूर १३५ चा पॅक १९० रुपयांवर जाऊन पोचला आहे. रीनचा ६४ रुपयांमध्ये चारचा पॅक येतो, तो ८८ रुपयांचा झाला आहे. डव साबण ४५ रुपयांवरून ५७ रुपये झाला आहे, तर त्याचा तीनचा पॅक १०५ रुपयांवरून १३५ रुपये झाला आहे. फरसाण १२० चे १५० तर १६० रुपये किलो मिळणारे २०० ते २२० रुपये किलो झाले आहे. ‘देश का नमक’ म्हणून ओळख असलेल्या टाटा मिठाच्या दरात ही २० रुपयांवरून पंचविशीत अशी घसघशीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आधी दोन वर्ष कोरोनाने आयुष्याची घडी बिघडविले आणि आता महंगाई डायन मार जाये, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Daily Essentials
सुट्टीतील वाचनालय; 'रूम टू रिड' योजनेंतर्गत पवारवस्तीत वाचनालय सुरू

गव्हाच्या दरात विलक्षण वाढ

भारतातून गहू मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. मागील महिन्यात १४० लाख टन गहू परदेशात निर्यात केला गेला. ज्या देशांना रशिया व युक्रेनही देश गहू पुरवठा करीत असे त्या देशांना भारत पुरवठा करीत आहे. त्यामुळे गव्हाच्या दरात विलक्षण वाढ झाली आहे. २४०० च्या गव्हाचे बाजार ३००० वर जाऊन पोचले आहेत. तर, ३० ते ३४०० रुपये दरम्यान असणाऱ्या सिहोर गव्हाचे भाव ३७ ते ४५०० रुपयांपर्यंत पोचले आहेत.

Daily Essentials
विद्यार्थ्यांना यंदा 2 गणवेश; केंद्र सरकारकडून 215 कोटींचा निधी मंजूर

"सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे जीव मेटाकुटीला आला आहे. काटकसर करून करून किती करणार. महागाई कमी होण्याचे नावच घेत नाही." - रेखा चौधरी, गृहिणी

"गॅस दरवाढ , इंधन दरवाढ तसेच इंधन दरवाढीचा परिणाम व कच्च्या मालाच्या दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होत आहे. सर्वसामान्यांनाचे जगणे अवघड झाले आहे. सरकार याकडे लक्ष देईल का?" - अर्चना साळुंखे, गृहिणी

"कच्च्या मालाच्या दरात व पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे साबण, फरसाण व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ सातत्याने सुरूच आहे." - राहुल भंडारी, व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.