Nashik News : शहरात अतिक्रमण मोहिमेचा धडाका

Nashik News : शहरात अतिक्रमण मोहिमेचा धडाका
esakal
Updated on

Nashik News : शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने अकार्यक्षमतेचा ठपका अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांच्यावर बसत असताना त्या ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. (large scale encroachment campaign was carried out in all 6 divisions of city nashik news)

मागील चार दिवसात शहराच्या सहाही विभागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. यात मेनरोड, शालिमार, रविवार कारंजासह बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्यात आले.

शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहे. वारंवार तक्रारी करूनदेखील दखल घेतली जात नाही. अतिक्रमणे हटत नसल्याने वाहतूक ठप्प होण्याबरोबरच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या संदर्भात पोर्टलवर नागरिकांनी तक्रारी केल्या.

मात्र, अतिक्रमणाच्या तक्रारी सुटत नसल्याने त्याची दखल वरिष्ठांनी घेत अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. त्यानंतर मागील चार दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण मोहीम राबविली जात आहे. कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेले साहित्य आडगाव येथील गोडाऊनमध्ये जमा केले जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik News : शहरात अतिक्रमण मोहिमेचा धडाका
Water Scarcity : इगतपुरी तालुक्यात गढूळ पाणीपुरवठा; भीषण पाणीटंचाईने नागरिक हैराण

मेनरोड, शालिमार व रविवार कारंजा या भागात झालेल्या कारवाईमध्ये टायर, स्टॅन्ड बोर्ड, बांबू, प्लास्टिक खुर्च्या, पाल, बोर्ड, बाकडे, फ्रेम, बॅनर, कपडे, चारचाकी हात गाड्या, प्लॅस्टिक रॅक, स्टील भांडी, कपड्यांची रॅक, मोठ्या छत्र्या, गॅस शेगडी, वॉशिंग मशिन, नळ, कापडी बॅग, प्लॅस्टिक जाळी, स्टील पाइप, प्लॅस्टिक टोपली, प्लॅस्टिक टप, फरशी पोचा असे एकूण २३८ नग साहित्य जप्त करण्यात आले.

त्यापूर्वी बिटको चौकातील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यात आली. बिटको चौकात असलेल्या न्यू फॅशन सेलचे दुकानाचे बांधकाम तोडले. आपले सरकार पोर्टलवरील अनधिकृत शौचालय संदर्भात दाखल तक्रारी वरून पक्के बांधकाम तोडण्यात आले.

जयभवानी रोडवरील दुर्गानगर उद्यानामध्ये अनधिकृत उभारलेल्या पुतळ्याकरिता पाया निष्कसित करण्यात आला. नाशिक- पुणे महामार्गावरील अनधिकृत मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. पंचवटी विभागातील म्हसरूळ गावालगत घरांचे फॅनिंग रस्ता रुंदीकरणात येणारे कच्चे बांधकाम व पात्रांच्या टपऱ्या तोडण्यात आल्या.

Nashik News : शहरात अतिक्रमण मोहिमेचा धडाका
Civil Hospital : जिल्हा रुग्णालयात 2 तास वीज गायब; उपकरणे बंद झाल्याने रुग्णांची गैरसोय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.