पोषण आहारात आढळली अळी; 325 विद्यार्थी उपाशीच गेले घरी

Floating larvae in a nutritious diet.
Floating larvae in a nutritious diet.esakal
Updated on

सिडको (जि. नाशिक) : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत (School nutrition diet Scheme) सिडकोमधील अंबिका शिक्षण मंडळ संस्थेच्या डॉ. डी. एस. आहेर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी श्री स्वामी समर्थ संस्थेमार्फत आलेल्या सोयाबीन खिचडीमध्ये एक संपूर्ण शिजलेली अळी आढळली. मुख्याध्यापिका आणि शिक्षकांच्या ही बाब लक्षात आल्याने हा पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटण्यात आला नाही. त्यामुळे ३२५ विद्यार्थी पोषण आहाराविना घरी गेले. (Larvae found in students mid day nutrition meal Nashik News)

शनिवारी (ता. २) दुपारी साडेबाराच्या सुमारास नेहमीप्रमाणे श्री स्वामी समर्थ संस्थेमार्फत हा शिजवलेला पोषण आहार शाळेत आला. नेहमीप्रमाणे मुख्याध्यापिका विद्या पाटील यांनी जबाबदारी दिलेल्या सविता वाघ यांनी आहार तपासण्यासाठी पातेल्यावरचे झाकण काढले असता, अगदी वरच पूर्ण शिजलेली अळी तरंगताना दिसली. त्या वेळी वाटपाचे काम करणाऱ्या महिलांनादेखील ही बाब बघितली. तातडीने मुख्याध्यापिका पाटील यांनी संस्थाप्रमुख बाळासाहेब पाटील आणि सचिव अमोल पाटील यांना माहिती दिली. श्री. पाटील यांनी संबंधित संस्थेच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून त्यांना ही बाब कळवली. दरम्यान, पालकांना ही बाब समजल्यानंतर पालकांनी संताप व्यक्त केला.

Floating larvae in a nutritious diet.
पंचवटीतुन मुलासह विवाहिता बेपत्ता

नजरचुकीने हा आहार खाल्ला गेला असता आणि त्यातून एखाद्या विद्यार्थ्याला काही बाधा झाली असती तर जबाबदारी कोणी घेतली असती, असा प्रश्‍न पालकांनी उपस्थित केला. संबंधित संस्थेमार्फत २९ शाळांना पोषण आहार पुरवला जातो. मात्र, आतापर्यंत कोणत्याही शाळेची तक्रार आली नसल्याचे समजते. मात्र, यापूर्वीदेखील अंबिका संस्थेमार्फत पोषण आहाराबाबत मनपा शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या प्रकाराबाबत पुन्हा तक्रार करण्यात आली आहे. सोमवारी (ता.४ ) संस्थेमार्फत थेट आयुक्तांची भेट घेण्यात येणार असून, याबाबत तक्रार केली जाणार आहे.

Floating larvae in a nutritious diet.
बिनशर्त स्‍वीकार्हता नसल्‍याने नात्‍यात कटुता : डॉ. मोहन आगाशे

"पोषण आहाराबाबत विद्यार्थ्यांच्या नेहमीच तक्रारी असतात. संबंधित संस्थेला वेळोवेळी सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहिले आहेत ."

- विद्या पाटील, मुख्याध्यापक

"ही अत्यंत गंभीर बाब असून, या संस्थेबाबत यापूर्वीदेखील शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत आता थेट आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत."

- बाळासाहेब पाटील, संस्थाचालक

"अंबिका संस्थेच्या पूर्वीच्या तक्रारीबाबत समर्थ संस्थेला यापूर्वीच नोटीस दिली आहे. या प्रकाराबाबतदेखील संबंधित पोषण आहार संस्थेला रीतसर नोटीस पाठवण्यात येणार असून, खुलासा मागविण्यात येणार आहे. मिळालेल्या तथ्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. दरम्यान, पोषण आहार तयार करणाऱ्या या संस्थेनेदेखील अंबिका संस्थेविरुद्ध यापूर्वी तक्रार केली असून, संस्थेकडेदेखील रीतसर खुलासा मागितला आहे."- सुनीता धनगर, मनपा, शिक्षण अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.