Nashik News : लासलगाव बसस्थानकाचे पालटणार रुपडे; 6 कोटी 70 लाखांच्या निधीतून होणार पुनर्बांधणी

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून लासलगाव बसस्थानकाची पुनर्बांधणी होणार आहे.
Lasalgaon bus stand reconstructed through special efforts of Minister Chhagan Bhujbal nashik news
Lasalgaon bus stand reconstructed through special efforts of Minister Chhagan Bhujbal nashik newsesakal
Updated on

Nashik News : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून लासलगाव बसस्थानकाची पुनर्बांधणी होणार आहे.

त्यासाठी राज्य शासनाने चार कोटी ८० लाख, तर हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत एमआयडीसीच्या माध्यमातून बसस्थानक सौंदर्यीकरण योजनेतून बसस्थानक वाहनतळाच्या काँक्रिटीकरणासाठी एक कोटी ९० लाख, असा एकूण सहा कोटी ७० लाखांच्या विविध कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. (Lasalgaon bus stand reconstructed through special efforts of Minister Chhagan Bhujbal nashik news)

त्यामुळे येथील बसस्थानकाची पुनर्बांधणी होऊन प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. लासलगाव बसस्थानकाचे बांधकाम १९७५ मध्ये झाले आहे. ४९ वर्षे झाल्यामुळे बसस्थानकाची अतिशय दुरवस्था झाली आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठी कांदा व शेतमालाची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बसस्थानकातून रोज ५३ बस सुटतात, तर ५० हून अधिक खेड्यांमधील प्रवासी स्थानकाचा लाभ घेतात.

मात्र, बसस्थानकामधील असुविधांमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याने बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता होती. यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या माध्यमातून लासलगाव बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी सहा कोटी ७० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

Lasalgaon bus stand reconstructed through special efforts of Minister Chhagan Bhujbal nashik news
Nashik News : चांदवड शहरात 11 हजार दिव्यांनी साकारले ‘ जय श्रीराम’! 251 जोडप्यांच्या हस्ते सपत्नीक पूजा

चार कोटी ८० लक्ष रुपयांतून बसस्थानकाचा तळमजला व पहिला मजला विकसित करण्यात येणार आहे. येथील बसस्थानकात नागरिकांना पिण्यासाठी, तसेच वापरासाठी पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्था, विद्युत काम, फायर फायटिंग यंत्रणा, रेन वॉटर हार्वेस्टिंग या यंत्रणा विकसित करण्यात येणार आहेत.

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने मंजूर केलेल्या एक कोटी ९० लाखांच्या निधीतून बसस्थानक वाहनतळाचे काँक्रिटीकरण करून सुसज्ज बसस्थानक विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अतिशय दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Lasalgaon bus stand reconstructed through special efforts of Minister Chhagan Bhujbal nashik news
Nashik Railway Station : रेल्वेस्थानकावर ‘CCTV’ची संख्या वाढणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.