Nashik News: लासलगाव बसस्थानकाचे बदलतेय रूप! एसची कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून मदत, प्रवाशांत समाधान

Lasalgaon bus stand getting a new look.
Nashik: जिल्ह्यात 525 कांदाचाळ उभारणीसाठी साडेपाच कोटी! खर्च दुप्पट वाढल्याने अनुदानात वाढ होण्याची अपेक्षा
Nashik: जिल्ह्यात 525 कांदाचाळ उभारणीसाठी साडेपाच कोटी! खर्च दुप्पट वाढल्याने अनुदानात वाढ होण्याची अपेक्षा esaka
Updated on

Nashik News : लासलगाव येथील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातून काही रक्कम खर्चून मरगळ आलेल्या बसस्थानकाचे रंगरंगोटी, वृक्षारोपण करून रुप बदलत असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

याचा एक भाग म्हणून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानांतर्गत ४१ वर्ष जुने असलेल्या बसस्थानकाची दुरवस्था झालेली आहे. बसस्थानक कार्यक्षेत्रात २०७ कर्मचारी कार्यरत असून, १६० चालक व वाहक आहेत. डेपोतील २५ कामगार व २७ स्टाफ यांनी रुपडं बदलायचा विडा उचलला आहे. (Lasalgaon bus station changing Self expense assistance by S.S. employees satisfaction among passengers Nashik News)

आपल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येक कर्मचारी पैसे जमा करून सर्वांत प्रथम स्थानकाचे बाह्यरूप बदलायला सुरवात केली आहे. स्थानकाला रंग देणे, बसस्थानकाच्या आवारात वृक्षारोपण करणे, स्थानकामधील नामफलक पाट्या यांचे नूतनीकरण केले आहे.

खर्चात बचत करून कर्मचारी स्वतः काम करताना दिसत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांबरोबर प्रवाशांनासुद्धा या नवीन वास्तूमध्ये समाधान वाटत आहे.

त्यामुळे एकीचे बळ काय असते, हे लासलगाव बसस्थानकातील कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे. परंतु याकामी प्रशासनानेसुद्धा थोडेफार प्रमाणात सहकार्य केल्यास नावलौकिकात निश्चितच भर पडेल.

कोरोनाकाळात या बसस्थानकात एकूण ५३ बस होत्या, आता फक्त ३६ बसवर कारभार चालत आहे. यामध्ये बसची अवस्था, त्यामुळे प्रवासात एसटी बंद पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचे उत्तम उदाहरण पुणे येथे लासलगाव बसची दुर्घटना केवळ चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे टळली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik: जिल्ह्यात 525 कांदाचाळ उभारणीसाठी साडेपाच कोटी! खर्च दुप्पट वाढल्याने अनुदानात वाढ होण्याची अपेक्षा
Nashik: जिल्ह्यात 525 कांदाचाळ उभारणीसाठी साडेपाच कोटी! खर्च दुप्पट वाढल्याने अनुदानात वाढ होण्याची अपेक्षा

स्थानकाच्या आवारात पिण्याच्या पाण्याची टाकी अनेक दिवसापासून भरलेली गेलेली नाही. यांत्रिक शाखेला दोन वर्षांपासून जबाबदार व्यक्तीची नेमणूक नाही. त्याचा परिणाम डेपोतून गाड्या उशिरा सुटतात. असे असले तरी कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या एकीला मात्र परिसरातील प्रवाशांनी सलाम केला आहे.

"माझ्या कर्मचाऱ्यांनी बसस्थानकाचे रुपडे बदलण्याचा विडा उचलला आहे. त्यांच्या एकीच्या माध्यमातून एकेक काम करून घेण्यात येत आहे. सध्या रंगरंगोटी व परिसरात वृक्षारोपणचे काम हाती घेतले आहे. जस-जसा पैसा जमा होईल उर्वरित कामे केले जातील."

-सविता काळे, आगार व्यवस्थापक, लासलगाव

"आपण जिथे काम करतो तो परिसर प्रसन्न असेल तर दिवसभर प्रसन्न वाटते. कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्वखुशीने रक्कम जमा करून काम सुरू केलेले आहे. त्यामुळे प्रवाशांनासुद्धा समाधान वाटते."-बाजीराव देवरे, बसचालक, लासलगाव आगार

Nashik: जिल्ह्यात 525 कांदाचाळ उभारणीसाठी साडेपाच कोटी! खर्च दुप्पट वाढल्याने अनुदानात वाढ होण्याची अपेक्षा
Dhule News: अल्पसंख्याक शाळांना सुविधांसाठी अनुदान! जिल्हाधिकारी शर्मा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.