लासलगाव : कांद्याचे आगार असलेल्या येथील बाजार समितीत कांद्याला कमाल तीन हजार ५५५ रुपये प्रतिक्विंटर दर मिळाला.
मंगळवारी (ता. १७) उन्हाळी कांद्याला किमान १,२०१ रुपये, कमाल ३,५५५, तर सरासरी ३,२५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाले. सध्या नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली असली, तरीही प्रमाण खूपच कमी आहे.
ती वाढण्यासाठी आणखी कालावधी लागू शकतो. त्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने पुन्हा खरीप आणि लेट खरीप कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे.
मार्च-एप्रिलमध्ये साठवलेल्या कांद्याचे वजन आणि प्रतवारी खालावली आहे. त्यामुळे भाव चढे असले, तरी त्याचा खूप काही फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. (Lasalgaon Onion Rs 3555 Average price Rs 3250 per quintal Nashik Onion News)
किरकोळ बाजारात कांदा दर वाढताच केंद्र सरकारने निर्यात शुल्क ४० टक्के लागू करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तान, तुर्कस्तान, पाकिस्तानमधील कांदा कमी प्रमाणात असल्याने भारताच्या कांद्याला मागणी वाढली आहे.
दुबईसह सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात सुरू राहिल्याने केंद्राचे निर्यातशुल्क वाढीने कांदा दरावर परिणाम झाला नाही.
या एकूण स्थितीत उन्हाळी कांद्याच्या भावाने तेजीकडे वाटचाल सुरू केली असून, तो तीन हजारांच्या आसपास पोचला आहे.
अफगाणिस्तानमधील भूकंप, तुर्कस्तान आणि पाकिस्तानमधील कांदा संपल्याने आता आखाती देशासह इतर देशांमध्ये उन्हाळी कांद्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे नवीन कांदा बाजारात येईपर्यंत कांदा दर चढेच राहतील, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.