दरोडेखोरांच्या टोळीला लासलगावात अटक; सर्व श्रीरामपूरचे

Lasalgaon police arrested a gang of six criminals who were preparing for a robbery
Lasalgaon police arrested a gang of six criminals who were preparing for a robbery Sakal
Updated on

लासलगाव (जि. नाशिक) : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा सराईतांच्या टोळीला लासलगाव पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून इंडिका कारसह १ लाख ३९ हजार रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेले सहाही जण श्रीरामपूर येथील रहिवासी असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.

पोलिसांनी सांगितले की मंगळवारी (ता.१९) शहरामध्ये पेट्रोलिंग सुरू असताना टाकळी विंचूर परिसरात नाकाबंदी केलेली होती. त्यावेळी चांदवडहून लासलगावकडे येणारी कार (एमएच १२. एमबी.४०७१) पोलिसांची नाकाबंदी पाहून थांबली. नाकाबंदीपासून काही अंतरावर पोलिसांना पाहून वाहन वळवित पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी धाव घेत वाहन थांबविले. कारमध्ये असलेले सहा जण दरवाजे उघडून पळण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस करत असताना त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत नाव, पत्ता सांगण्यास नकार दिला. पोलिसांनी त्यांची व वाहनाची झडती घेतली असता दरोडा टाकण्याचे साहित्य साधने मिळून आले.

Lasalgaon police arrested a gang of six criminals who were preparing for a robbery
नाशिक जिल्ह्यात पुन्‍हा पॉझिटिव्‍ह रुग्णांचा आकडा शंभरी पार

पोलिसांनी ताब्यात घेतलेले साबीर शब्बीर कुरेशी (२८) सर्फराज बाबा शेख (१९), कुर्बान इस्माईल शेख (२३), सनिराज विलास ढोंकणे (१९), सागर ऊर्फ संदिप सुरेश कांबळे (२६), योगराज मोहन सोनवणे (२४, सर्व रा. श्रीरामपूर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, सहाय्यक उपनिरीक्षक शिवाजी घोडे, पोलिस नाईक राजेश घुगे, योगेश शिंदे, कैलास महाजन, संदीप शिंदे, पोलिस कॉन्टेबल प्रदीप आजगे, सागर आरोटे, संजय देशमुख तपास करत आहेत.

Lasalgaon police arrested a gang of six criminals who were preparing for a robbery
नाशिकमध्ये फुटणार फटाके! सर्वपक्षीयांनी एकमताने फेटाळला प्रस्ताव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.