Nashik Gas Cylinder Crisis: कृत्रिम टंचाईमुळे लासलगावकर ‘गॅस’वर! 8 ते 10 दिवसांपासून सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा

Gas Cylinder
Gas Cylinderesakal
Updated on

लासलगाव : अनेक दिवसांपासून लासलगाव व परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे लासलगावकरांना गॅसवर राहण्याची वेळ आली आहे. (Lasalgaonkar trouble due to artificial scarcity shortage of gas cylinder from 8 to 10 days nashik)

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून लासलगावकरांना गॅस पुरवठा तुरळक होत आहे. सिन्नर प्लेटमधून सिलिंडर येण्यासाठी जाधव एजन्सीजकडून पूर्तता होत नाही. त्यामुळे सध्या कंपनीद्वारे ओझर गॅस एजन्सीमार्फत काही प्रमाणात सिलिंडरचा पुरवठा सुरू आहे.

त्यामुळे लासलगावकरांना ‘सिलिंडर शिल्लक नाही’, हा बोर्ड सतत बघावयास मिळतो. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून, बुकिंग केल्यानंतरही सिलिंडर वेळेत मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

सिलिंडर मिळविण्यासाठी येथील जाधव गॅस एजन्सीकडे चकरा माराव्या लागत आहेत. शिवाय कर्मचारी ग्राहकांशी व्यवस्थित बोलत नाहीत.

घरगुती सिलिंडरधारकांनी नोंदणी केल्यानंतर अनेक दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. तर हेच सिलिंडर हॉटेल व्यवसायिकांनी किंवा अनधिकृत मागणी केल्यानंतर जास्तीचे पैसे आकारून त्यांना तत्काळ मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारने घरगुती सिलिंडरवर सबसिडी देत दर कमी केले, तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ केल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांनी घरगुती सिलिंडरकडे मोर्चा वळविल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

Gas Cylinder
NMC News: सिंहस्थ कामसंदर्भात मनपाची हालचाल शून्य!

अनेक दिवसांपासून लासलगाव परिसरात ही समस्या भेडसावत आहे. लासलगाव व परिसरातील ग्राहकांना येथील जाधव गॅस एजन्सीमार्फत सिलिंडरचा पुरवठा केला जातो.

मात्र, ऑनलाइन नोंदणी करूनही एजन्सीकडून वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. सिलिंडरची कृत्रिम टंचाई झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सिलिंडर पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांनी केली आहे.

"गेल्या काही आठवड्यांपासून नोंदणी केल्यानंतरही घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा एजन्सीकडून वेळेवर होत नसून, नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन पुरवठा सुरळीत करावा."- भानुदास बकरे, रहिवासी, लासलगाव

"मी रोजंदारी करणारी महिला असून, मला सिलिंडर मिळविण्यासाठी दोन ते तीन वेळा हेलपाटे मारावे लागले. त्यामुळे माझी रोजंदारी बुडाली. रोजंदारी बुडूनही सिलिंडर मिळेल, याची शाश्‍वती नाही."-त्रस्त महिला, लासलगाव

Gas Cylinder
NMC News: जाहिरातींसाठी शहरात 14 नवीन ठिकाणे! 36 दिशादर्शक फलकांचा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.