Onion Agitation : लासलगावच्या आंदोलनाची अखेर दखल; पालकमंत्री दाखल, कांदाप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार

लिलाव बंद पडल्यामुळे दीड कोटीची उलाढाल ठप्प झाली
Maharashtra State Onion Producers' Association Bharat Dighole and Officer Shiva Sureshe while giving a statement after the discussion by Guardian Minister Dada Bhuse.
Maharashtra State Onion Producers' Association Bharat Dighole and Officer Shiva Sureshe while giving a statement after the discussion by Guardian Minister Dada Bhuse.esakal
Updated on

लासलगाव (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्यात कांदा दरातील घसरणी संदर्भात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलिव बंद ठेवत आज सकाळपासून आंदोलन सुरू केले.

पालकमंत्री आल्यशिवाय आंदोलन मागे न घेण्याची बूमिका शेतकरी संघटनेने घेतल्याने सायंकाळपर्यत लिलाव ठप्प झाले, यामुळे सुमारे दीड कोटीची उलाढाल ठप्प झाली.

दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची दखल घेत पालकमंत्री दादा भुसे लासलगावी दाखल झाले, त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करत याप्रश्‍नी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी शेतकऱ्यांची बैठक घेऊन दराप्रश्‍नी तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (Lasalgaons farmer onion agitation finally noticed Guardian Minister bhuse assured meeting with Chief Minister on onion issue nashik news)

 कांदा दरासंदर्भात कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे झालेल्या आंदोलनानंतर पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करताना शेतकरी.
कांदा दरासंदर्भात कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे झालेल्या आंदोलनानंतर पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करताना शेतकरी.esakal

तत्पूर्वी येथील बाजार समितीच्या आवारात आज सकाळच्या सत्राचे लिलाव सुरू झाले, तथापि वीस वाहनांचे लिलाव झाल्यानंतर संघटनेतर्फे कांद्याच्या दरातील घसरणीमुळे संतप्त होऊन कांद्याचे लिलाव बंद पाडले. जिल्ह्यात कांद्याचे भाव दररोज कोसळत आहेत, उत्पादन खर्चही निघत नसल्याने कंटाळून आजचे आंदोलन करण्यात आले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्याने कांद्याला 1500 रूपये क्विंटल अनुदान त्वरीत जाहीर करण्यात यावे, आज जो कांदा तीन ते पाच रुपये किलो भावाने चालू आहे तो थांबवून त्याला 15 ते 20 रूपये किलो भाव मिळावा, कांद्याला प्रति किलो 30 रुपये हमीभाव मिळावा अशा मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू होणार नाही अशी भूमिका महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे व आंदोलनकर्त्यांनी घेतली.

जोपर्यंत केंद्र सरकार व राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत कांदा लिलाव सुरू करणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. दोन ते चार रुपये किलोने कांदा विक्री होत असेल तर ते संघटनेला मान्य नसल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. किमान 20 ते 30 रूपये प्रति किलो भाव मिळाला पाहिजे अशी घोषणा अधिवेशनात करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Maharashtra State Onion Producers' Association Bharat Dighole and Officer Shiva Sureshe while giving a statement after the discussion by Guardian Minister Dada Bhuse.
Electricity News: पूर्व भागाचा वीजपुरवठ्याचा प्रश्‍न मिटणार; वावी, पाथरे उपकेंद्रांना शहा केंद्रातून वीजजोडणी

सकाळच्या सत्रात अचानक लिलाव बंद पडल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ व सहकारी आदिनाथ कोठळे, लहानू धोक्रट, कैलास महाजन, प्रदीप आजगे, सुजित बारगळ, सागर आरोटे, नंदकुमार देवडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. निफाडच्या प्रांत अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे यांच्यासह अधिकारी उपस्तित होते.

सर्कल देवचित्ते, तलाठी नितीन केदार यांच्या टीमने पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क करून शेतकऱ्यांच्या भावना कळविल्या, त्यानंतर पालकमंत्री भुसे तातडीने लासलगावी दाखल झाले अन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

तत्पूर्वी बाजार समितीच्या प्रशासक सविता शेळके, तहसीलदार घोरपडे यांनी उपोषणकर्त्यांशी तीन ते चार वेळा चर्चा केली पण पालकमंत्री आल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या भुमिकेवर ते ठाम राहिले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांद्यांचे ट्र्क्टर माघारी नेले काहींनी दुसऱ्या बाजार समितीत नेले.

Maharashtra State Onion Producers' Association Bharat Dighole and Officer Shiva Sureshe while giving a statement after the discussion by Guardian Minister Dada Bhuse.
Marathi Rajbhasha Din : भाषिक खेळांतून लावली मायमराठीची गोडी! निफाडच्या वैनतेय विद्यामंदिरातील अनोखा प्रयोग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.