Nashik News : हरसूलच्या जंगलात लाकडाच्या लगद्याचे घरटे; ‘लेसर बॅन्डेड हॉर्नेट’ माशीची निर्मिती

Laser Banded Hornet fly built nest of wood pulp in Harsul forest nashik news
Laser Banded Hornet fly built nest of wood pulp in Harsul forest nashik newsesakal
Updated on

Nashik News : जिल्ह्यातील हरसूल (ता. त्र्यंबकेश्‍वर) जंगलात ‘लेसर बॅन्डेड हॉर्नेट’ माशीने लाकडाच्या लगद्याचे घरटे बनवले आहे. ईशान्य भारतातील अनेक जमातींमधील एक खाद्य कीटक म्हणून ही माशी ओळखली जाते. देशात प्रजातीच्या माशीचे तीन रंग आढळतात.

टेगराइटसह काळे डोके मोठ्या प्रमाणात, केशरी-पिवळी असणारी ही प्रजाती उत्तर-पूर्व भारतात आढळते. तांबूस तपकिरी डोके व केशरी-पिवळ्या स्वरूपात ही माशी दिसते. तांबूस तपकिरी डोके, अरुंद केशरी-पिवळ्या पट्ट्यासह ही प्रजाती दक्षिण भारतात आढळते. (Laser Banded Hornet fly built nest of wood pulp in Harsul forest nashik news)

‘लेसर बॅन्डेड हॉर्नेट’ प्रामुख्याने आशियाच्या उष्णकटीबंधीय आणि उप-उष्णकटीबंधीय प्रदेशांच्या सखल प्रदेशात आढळते. झाडे, झुडपे अशा विविध आधारांवर घरटे बांधतात. गवताळ भागात, जंगलात अथवा पडीक जमिनीजवळ ते आढळतात.

मनुष्याला सर्वाधिक भीती वाटत असल्याने कमी पट्ट्या असलेला ‘हॉर्नेट’ दृष्ट आणि प्राणघातक असल्याचे मानले जाते. त्यांच्या घरट्याला नुकसान पोचवल्यास त्या हल्ला करतात. कीटकाची मादी लांब पल्ल्याचा पाठलाग करू डंक मारते.

व्हेस्पा लिनिअस (हायमेनॉप्टेरा : वेस्पिडे) वंशाचे सदस्य ‘हार्नेट वॉप्स’ म्हणून ओळखले जातात. लाकडाचा लगदा वापरून त्या घरटी बांधतात. त्यांच्या मोठ्या वसाहती आहेत. ज्यात एक राणी, मोठ्या संख्येने निर्जंतुकीकरण कामगार आणि नर असतात. आतापर्यंत जगात २३ वैध प्रजाती ज्ञात आहेत.

Laser Banded Hornet fly built nest of wood pulp in Harsul forest nashik news
Saptashrungi Gad : आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगडाचा चेहरामोहरा बदलणार! ही विकासकामे होणार

त्यात भारतीय उपखंडातील १६ प्रजाती आणि भारतातील १५ प्रजाती आहेत. कीटकांना अन्न म्हणून खाण्यात येते. खाद्य कीटकांच्या प्रजातींमध्ये प्रथिने, आवश्यक अमिनो ॲसिड आणि इतर सूक्ष्म पोषक घटक असतात. अनेक कीटक प्रजाती वेगवेगळ्या रोगांवर उपचार करण्यासाठी वापरल्या गेल्या आहेत.

शेती, जंगल आणि आरोग्यदायी कीटकांचे भक्षक म्हणून त्या फायदेशीर आहेत. व्हेस्पाच्या अळ्या आणि प्युपेचा वापर जगाच्या काही भागांमध्ये अन्न म्हणून केला जातो. मनुष्याला आणि पाळीव प्राण्यांना डंख मारतात म्हणून त्या हानिकारक आहेत. मधमाशांचे नैसर्गिक शत्रू आहेत. कापणीच्या अगोदर त्यांना खाऊन फळांचे नुकसान करतात.

"आमच्या शेताजवळील जंगलात मला घरटे दिसले. घरटे खूप वेगळे आहे. मी माश्यांना मुंग्यांच्या घरट्यावर त्यांचे घर बनवताना पाहिले आहे. मधमाश्यांना खाताना पाहिले आहे. आम्ही माश्यांना त्रास देत नाही. ती चावल्यास खूप वेदना होतात. अशी घरटी वृक्षतोडीमुळे कमी होत चालली आहेत." - रामदास भोये, शेतकरी

Laser Banded Hornet fly built nest of wood pulp in Harsul forest nashik news
YCMOU News : ‘मुक्‍त’ होणार ‘हनी बी व्‍हिलेज’! मधमाश्‍यांचे गाव म्‍हणून 100 खेड्यांचा पुढील टप्प्‍यात विकास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.