Nashik ZP News : देयके देण्यासाठी अखेरचे 3 दिवस; जिल्हा परिषदेत मार्च एंडची गुरुवार डेडलाइन!

ZP Nashik latest marathi news
ZP Nashik latest marathi newsesakal
Updated on

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागाकडून यंदा ऑफलाइन देयके काढली जात असल्याने निधी वेळेत खर्च व्हावा, याकरिता मार्च एंडचे काम मे-जूनअखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

मात्र, मार्च एंड संपविण्याची गुरुवार (ता. १३) डेडलाइन अंतिम झाली आहे. त्यामुळे विविध विभागांना देयके सादर करण्यासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत देयके सादर झाल्यास ती देयके काढली जातील, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. (Last 3 days to make payments Thursday deadline of the end of March in Nashik ZP News)

जिल्हा परिषदेत सर्व प्रकारच्या निधीचे वितरण करण्यासाठी पीएफएमएस प्रणाली कार्यान्वित होती. त्यामुळे गत वर्षीचा मार्च एंड वेळात अगदी १५ एप्रिलच्या आसपास संपला होता. यंदा मात्र पीएफएमएस प्रणाली बंद असल्याकारणाने ऑफलाइन देयके काढली जात आहेत.

गत आर्थिक वर्षात राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे निधी नियोजनाला तीन महिने स्थगिती होती. ती स्थगिती उठल्यानंतरही डिसेंबरपर्यंत नियोजन सुरू होते. पुढे जानेवारीत विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने पुन्हा ब्रेक लागला होता.

त्यामुळे फेब्रुवारी व मार्च या दोनच महिन्यांत प्रशासकीय मान्यता देणे, निविदा राबवणे, कार्यारंभ आदेश देणे याबाबींची पूर्तता करावी लागली. यामुळे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर संबंधित विभागाने ते काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.

यामुळे हा निधी अखर्चिक राहिल्यास तो परत जाऊन राज्य पातळीवर प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल, यामुळे जिल्हा नियोजन समिती, जिल्हा कोशागार विभाग व जिल्हा परिषदेसह इतर सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी परस्पर सामंजस्याने कार्यारंभ आदेश दिलेल्या सर्व कामांची देयके काढून घ्यायची व नंतर जूनअखेरपर्यंत ही कामे संबंधित ठेकेदारांकडून करून घ्यायची, असे निश्चित केले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

ZP Nashik latest marathi news
MSRTC Bus Discount : पिंपळगाव आगारातून 2 कोटींचा मोफत प्रवास; 22 दिवसात इतक्या महिलांनी घेतला सवलतीचा फायदा!

त्यामुळे ३१ मार्च संपला असला तरी देयके काढण्याचे काम सुरू राहणार असल्याने अत्यंत संथगतीने देयके सादर करण्याचे काम सुरू होते. १० एप्रिल उजाडून विभागाकडून महत्त्वाची देयके सादर झालेली नव्हती; परंतु १३ एप्रिलपर्यंतच देयके स्वीकारण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

याबाबत, राज्य शासनाकडून आदेश प्राप्त झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे विविध विभागाचे राहिलेली देयके सादर करण्याकरिता केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. यातच ही देयके सादर करावी लागणार आहे.

१३ एप्रिलनंतर कामांची देयके घेतली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे डेडलाइन आल्याने जिल्हा परिषदेत पुन्हा धावपळ सुरू झाली असून, गर्दी वाढली आहे.

ZP Nashik latest marathi news
Dr. Bharati Pawar : जलयुक्त शिवारसाठी 231 गावांची निवड; डॉ. पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.