Inspirational News : आयुष्यातील संकटे झेलत उभ्या राहिल्या लताताई

Latatai Musale and Son Karan while helping his mother.
Latatai Musale and Son Karan while helping his mother.esakal
Updated on

शेतकरी कुटुंबात जन्म... जगण्यासाठीचा संघर्ष तेव्हापासूनच... आयुष्याची प्रत्येक वाट गुंतागुंत निर्माण करणारी... कुटुंबासाठी काहीतरी करण्यासाठी तिची धडपड सुरू होती, मात्र परिस्थिती अनुकूल नव्हती.

वयाच्या अकराव्या वर्षीच मजुरी कामासाठी घराबाहेर जावे लागले, त्यामुळे पाचवीच्या वर्गात असतानाच शिक्षण सुटलं... संघर्षाची पायवाट तुडवताना आलेल्या संकटांनाच संधी मानून स्वतःमधील सुगरण उभी केली. कुटुंबासाठी पॉपकॉर्न विक्री सुरू केली अन् संकटे झेलत त्या उभ्या राहिल्या. नाशिकजवळच्या साडेगाव येथील लताताई मुसळे यांची प्रेरणादायी कथा... (Latatai stood facing hardships of life inspirational news)

परिस्थिती कशीही असली तरी ती नक्कीच बदलते, यावर विश्वास ठेवणाऱ्या लताताईंचे शिक्षण जेमतेम पाचवी पास. माहेर नाशिक तालुक्यातील साडगाव येथील, तर सासर इगतपुरीजवळच्या नांदूरवैद्य येथील. वडील पांडुरंग दामू तांबेरे यांचे पत्नी लीलाबाईसह दोन भाऊ व एक बहीण, असं कुटुंब. शेतमजुरीसह शेती करणाऱ्या कुटुंबाचा घटक होताना वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षीच लताताई यांच्यावरही कष्टाची परिस्थिती येऊन पडली होती. अभ्यासात हुशार असूनही केवळ गावात चौथीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था असल्याने पुढील शिक्षणासाठी बाहेर जाणे अशक्य झाले.

आव्हानं ठरलेलीच

कुटुंबाची जबाबदारी कमी करतानाच लताबाई यांच्यावर वैवाहिक आयुष्याची जबाबदारी आल्याने परिस्थितीशी जुळवून घेत त्यांनी आपला दिनक्रम सुरू ठेवला. सासरी नांदूरवैद्य येथेही कष्ट वाट पाहातच होते. शेतमजुरीशिवाय मुसळे परिवारालाही पर्याय नव्हता. मात्र परिस्थितीला बसून राहण्याची मुभा नाही, या विचारांवर ठाम राहत लताबाई यांची वाटचाल सुरू होती. कुटुंबात मुलगा करण व मुलगी सोनाली यांच्या निमित्ताने सदस्यांची संख्या वाढली. लताबाईंनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास सुरवात केली. त्यांना पोषक वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी आपला मुक्काम माहेरी साडगाव येथे हलवला.

सकारात्मक विचारांना नेले पुढे

अभ्यासात हुशार असलेल्या करण व सोनाली या दोन्ही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष पुरवताना येणाऱ्या प्रत्येक दिवसाला त्या संधी म्हणून पाहत होत्या. मजुरी करतानाच काहीतरी वेगळे उभे करण्याची त्यांची धडपड त्यांना अस्वस्थ करत होती. यासाठी आई लीलाबाई यांनी दिलेले बळ मोलाचे असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.

साडगावजवळ असलेल्या गिरणारे येथील बाजारपेठेची गरज ओळखून लताताई यांनी मक्यापासून लाह्या तयार करत विक्री करायला सुरवात केली. तुटपुंज्या भांडवलावर घरगुती पद्धतीने मजुरीच्या पैशांतून या व्यवसायाला पुढे नेण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. घरच्या घरी लहान कढईत मक्यापासून लाह्या फोडत बाजारपेठेत नेण्यासाठीची त्यांची धडपड थक्क करणारी ठरली. मुलगा करणही त्यांना मदत करतो.

Latatai Musale and Son Karan while helping his mother.
Inspirational News: सुई-दोरा बनला चांदवडच्या सुनंदाताईंच्या कुटुंबाचा आधार!

धडपड उभारी देणारी...

आठवडाभर जमा झालेल्या भांडवलातून नाशिक येथून मका खरेदी करून लाह्या तयार करताना मुलगा करण याने गिरणारे पंचक्रोशीत बाजारपेठ मिळविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले. कोरोनाकाळात रोजगाराअभावी कुटुंबावर ओढवलेल्या प्रसंगातही त्यांनी लाह्या विक्रीतून कुटुंबाला सावरले. हृदयविकारातून सावरतानाच मुलांसाठी भक्कम आधार बनलेल्या लताताईंनी मुलगी सोनाली यांच्या विवाहासाठीही स्वतःच्या प्रयत्नांतून खर्चाची बाजू भक्कमपणे पेलली.

गिरणारे पंचक्रोशीत मायलेकांनी उभी केलेली पॉपकॉर्न विक्रीतील ओळख खचून गेलेल्या घटकांसाठी उभारी देणारी ठरलीय. परिसरातील बाजार समिती, मोठ्या हॉटेल्स, दुकानदार, शाळा- महाविद्यालयांच्या परिसरात लताताई यांनी तयार केलेले पॉपकॉर्नने आपली विक्रीव्यवस्था बळकट केली.

मुलाला उद्योजक बनवायचंय

परिस्थितीने खचून न जाता त्यांनी साडगावसारख्या ग्रामीण भागात राहूनही व्यवसायाची संधी शोधली. लाह्या तयार करत उभा केलेला व्यवसाय कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणारा ठरला. या व्यवसायाला मुलगा करण याने पुढे नेताना स्वतःची ओळख उभी करावी, अशी अपेक्षाही त्या व्यक्त करतात.

आयुष्यातील आलेल्या प्रतिकूल परिस्थितीतही खचून न जाता उभारी देताना आई लीलाबाई, मुले करण व सोनाली, जावई महेश थेटे, तसेच कचरू तांबेरे, तनिष्का लिडर सरस्वतीताई खुर्दळ, मुन्नाभाई मणियार, तांबेरे परिवार आणि ग्रामस्थांनी दिलेल्या आधारामुळे स्वतःला भक्कम करू शकल्याचे लताबाई अभिमानाने सांगतात

Latatai Musale and Son Karan while helping his mother.
Inspirational News : सिक्युरिटी एजन्सीतून मनीषाताईंनी उभी केली ओळख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.