Keshubbhai Mahindra : ज्येष्ठ उद्योगपती केशूबभाई महिंद्र यांनी २ ऑक्टोबर १९८० ला नाशिकमधील सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये महिंद्र ॲन्ड महिंद्र प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आणि नाशिकच्या अर्थकारणाला गती मिळाली. केशूबभाई आणि नाशिककरांमध्ये आपुलकीचे ऋणानुबंध तयार झाले.
प्रकल्पाचे बांधकाम १९८२ ला पूर्ण करत पहिल्या मिनीबसचे उत्पादन करत नाशिकच्या औद्योगिक क्रांतीला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. त्याचबरोबर तळेगाव-इगतपुरीमधील महिंद्रच्या प्रकल्पातून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली. (late Keshubbhai mahindra laid foundation stone of Mahindra and Nashiks economy gained momentum news)
केशूबभाईंनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती नाशिकमध्ये पोचताच, महिंद्रच्या कामगारांसह कामगारांमधून लघुउद्योजक झालेले अशा प्रत्येकाला अश्रू अनावर झाले. मुंबई-पुण्यानंतर वेगाने विकसित होणारे महानगर, अशी नाशिकची ओळख तयार होण्यात केशूबभाईंचे योगदान अनन्यसाधारण राहिले.
वाहन उद्योगाचा शहराच्या विकासात हातभार लागला आहे. महिंद्रप्रमाणे बॉश (पूर्वाश्रमीची मायको) कंपनी आल्यानंतर रोजगारनिर्मितीला वेग आला. याशिवाय महिंद्रसाठी काम करणाऱ्या छोट्या-मोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या.
जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात सव्वादोन लाख कामगार कार्यरत आहेत. त्याचे श्रेय नाशिककर केशूबभाईंनी सुरू केलेल्या महिंद्र ॲन्ड महिंद्र या ‘मदर इंडस्ट्री’ला देतात.
महिंद्र ॲन्ड महिंद्रचा प्रकल्प ५० कामगारांवर सुरू झाला. सातपूरच्या प्रकल्पात आता अठराशे, तर इगतपुरीच्या प्रकल्पात पावणेचारशे कायम कामगार आहेत. प्रशिक्षणार्थी दीड हजारांहून अधिक, तर कार्यालयीन कर्मचारी सातशेच्या आसपास आहे.
२००६ मध्ये सर्वाधिक साडेतीन हजार कायम कामगार होते. महिंद्रसमवेत १९६९ मध्ये मायकोचे छोटे वर्कशॉप सुरू झाले. त्यानंतर सातपूरला स्वतःची जागा घेऊन कंपनीची उभारणी करण्यात आली.
कंपनीला मोठ्या प्रमाणात ‘ऑर्डर्स’ मिळाल्याने विकास झपाट्याने होत गेला. नाशिकमध्ये कंपनीचा ९९ एकरांचा प्रकल्प आहे. सात इमारती आहेत. कंपनीत २०२० पर्यंत दोन हजार ८०० कामगार कायम होते.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
महिंद्र आणि बॉश या दोन कंपन्यांसाठी सुटे भाग बनवणे, प्रक्रिया करणे, असे छोटे-मोठे युनिट सुरू झाले. त्यातून एका कामगारापासून ते एक हजार कामगारांपर्यंत रोजगारनिर्मिती झाली. याशिवाय ॲटलास, कॉप्को, सीएट, ग्रीव्हज, ग्रॅफाइट इंडिया, श्नायडर इलेक्ट्रिक, थीसनक्रूप, इप्कॉस, एव्हरेस्ट इंडस्ट्रीज,
गॅब्रिएल इंडिया, ग्लॅक्सो स्मिथक्लाइन, हिंदुस्थान कोका कोला, हिंदुस्थान युनिलिव्हर, जिंदाल पॉलिस्टर, ज्योती स्ट्रक्चर, किर्लोस्कर ऑइल इंजिन, केएसबी पम्पस, लार्सन अॅन्ड टुब्रो, महिंद्र सोना, युनायटेड स्पीरिट्स, परफेक्ट सर्कल इंडस्ट्रीज, सॅम्सोनाइट,
शालिमार पेंट्स, व्हीआयपी इंडस्ट्रीज, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, एक्स्लो इंडिया, जिंदाल सॉ अशा कंपन्यांनीही रोजगारनिर्मितीला मोठा हातभार लावला. मोठ्या कंपन्यांमध्ये सव्वा लाख, तर इतर कंपन्यांत लाखभर कामगार सध्या नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
चौफेर विकासात योगदान
खेड्यातून अंगावरच्या कपड्यांनिशी आलेले कामगार आज समृद्ध जीवन जगताहेत. लाख रुपयांपर्यंतचे वेतन कामगारांना मिळत आहे. कामगारांची मुले नोकरी-शिक्षणासाठी परदेशात गेले आहेत.
कामगारांच्या हातात पैसा आल्याने बाजारपेठेतील चलन-वलन वाढत गेले. घरांची आवश्यकता वाढल्याने बांधकाम व्यवसाय तेजीत आला. दरम्यान, गुरुवारी (ता. १३) दुपारी बाराला दोन मिनिटे जागेवर स्तब्ध उभे राहून केशूबभाईंना महिंद्र प्रकल्पातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यासंबंधीची माहिती कामगार आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोचविण्यात आली आहे.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
नाशिककरांसाठी १९९७ ची शेवटची भेट
नाशिकमधील प्रकल्पाला १९९७ मध्ये केशूबभाईंनी भेट दिली होती. ती नाशिककरांसाठी शेवटची भेट ठरली. महिंद्र कंपनीतील मुख्य प्रवेशद्वारासमोर केशूबभाईंच्या झालेल्या भेटीवेळी कामगार संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष शिरीष भावसार, कंपनीचे तत्कालीन महाव्यवस्थापक सी. आर. राव,
कार्मिक वरिष्ठ महाव्यवस्थापक डी. के. शहा, सरव्यवस्थापक मिलिंद राजवाडे, राधाकृष्ण पिल्लाई, एकनाथ अहिरे, प्रभाकर काकडे, चंदर स्वामी, चूडामण बेडसे, शिवाजी विधाते, कार्मिक व्यवस्थापक घन,
एम. व्ही. शिरसाठ, मंगलाकर राव, राजन नायर आदी उपस्थित होते. मुंबई-आग्रा महामार्गावरील प्रेमदान दवाखाना सुरू झाला त्या वेळी केशूबभाईंनी दवाखान्यासाठी रुग्णवाहिका दिली होती.
"केशूबभाई महिंद्र यांच्या दूरदृष्टीमुळे नाशिकमध्ये औद्योगिक क्रांती झाली, असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. माझ्या कार्यकाळात एकदाच ते नाशिक प्रकल्पात आले होते. त्या वेळी त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील कामगार व कर्मचारी यांची आवर्जून भेट घेऊन विचारपूस केली. मोठ्या व्यक्तिमत्त्वाचे पाय नेहमी जमिनीवर राहिले, ही शिकवण मला मिळाली. केशूबभाई महिंद्र यांना विनम्र आदरांजली." - हिरामण आहेर, माजी उपाध्यक्ष, महिंद्र अॅन्ड महिंद्र
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.