Nashik crime News : त्यांना तत्काळ अटक करा, अन्यथा...; मयत शिंदेच्या पत्नीचा पोलीस अधीक्षकांना इशारा

crime news
crime newsesakal
Updated on

नाशिक : पतीला खोट्या गुन्ह्यांत फसवून त्यांचा छळ करणारे भाजपचे पदाधिकारी विक्रम नागरे व मुकेश शहाणे यांना तत्काळ अटक करून कारवाई करावी, असे निवेदन आत्महत्त्या केलेल्या अनिरुद्ध शिंदे याची पत्नी वैशाली शिंदे हिने पोलिस अधीक्षकांना दिले.

दरम्यान, या गुन्ह्यातील दोघेही संशयित मंत्री गिरीष महाजन यांच्या जवळचे असून ते पोलिसांवर दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप वैशाली शिंदे यांनी केला आहे. (Late Shinde wife warns Superintendent of Police over bjp leaders torture to shinde suicide case Nashik crime News)

निवेदनानुसार, मयत अनिरुद्ध यांनी केलेली आत्महत्या लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. माझे पती अनेक दिवसापासून मुकेश शहाणे आणि विक्रम नागरे यांच्या दहशतीखाली वावरत होते.

त्यांनी दहशत निर्माण करून माझ्या पतीस आत्महत्येस प्रवृत्त केले. ही बाब आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट नमूद आहे. मात्र, घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर हे विक्रम नागरे यांचे नातेवाईक असल्याने तक्रारीचे गांभीर्य घेतले गेले नाही.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

crime news
Nashik Crime News : विम्याची रक्कम हडपणाऱ्या संशयितांनी फिरस्त्याचा केला खून

पतीचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवल्यावर तणाव निर्माण झाल्याने खेडकर यांनी तक्रारीची दखल घेतली. ज्या कलमान्वये गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. त्यात कमी कलम लावण्यात आले आहेत. मंत्री गिरीष महाजन यांचा पोलीस यंत्रणेवर दबाब असल्यामुळे तक्रार नोंदविण्यात विलंब झाला असून अशा समाजकंटकांना मंत्र्याने मदत करणे योग्य नाही, असे म्हटले आहे.

शहाणे व नागरे यांच्यावर खंडणी व तत्सम गुन्हे दाखल आहेत. राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसून मंत्री महोदयांमुळे पोलीस यंत्रणेवर दबाब आहे. त्यामुळे शहाणे व नागरे यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मला व माझ्या मुलांना न्याय मिळणार नाही. अन्यथा आपल्यासमोरही आत्महत्त्येशिवाय पर्याय नाही, असे वैशाली शिंदे यांनी म्हटले आहे.

crime news
Nashik Crime News : इगतपुरी येथे अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.