निर्जनस्थळी वास्तव्य करणाऱ्या जरीफ बाबाकडे यंत्रणांचे दुर्लक्ष?

Late Syed Zarif Chisti Baba and his residence in nashik district
Late Syed Zarif Chisti Baba and his residence in nashik districtesakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : अफगाणी नागरिक सुफी धर्मगुरू ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिस्ती ऊर्फ जरीफबाबा यांची दोन दिवसांपूर्वी येवल्यात हत्या झाली. अफगाणिस्तानातून निर्वासित म्हणून भारतात आश्रय घेतलेल्या जरीफ बाबांचा मुक्काम एक वर्षापासून सिन्नर तालुक्यातील वावी येथे होता. शिर्डीच्या साई मंदिरापासून अवघ्या चाळीस किलोमीटरवर व तेही भाडोत्री बंगला घेऊन वास्तव्य करणाऱ्या जरीफ बाबांच्या हालचालीवर प्रशासकीय व अंतर्गत सुरक्षेची जबादारी असलेल्या पोलिस यंत्रणेने लक्ष ठेवले असते तर त्यांच्या हत्येचा प्रकार घडला नसता, अशी चर्चा आता सुरू आहे. (Latest marathi news)

Late Syed Zarif Chisti Baba and his residence in nashik district
एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याप्रमाणे चोरटा सांगतोय त्याचे कार्यक्षेत्र...

पिंपरवाडी शिवारात बंगला भाडेतत्त्वावर घेऊन जरीफबाबा व त्याचे दोन सहकारी राहत होते. या बंगल्याचा भाडेकरार कोळपेवाडी येथील एका एजंटामार्फत जरीफबाबा व त्याचा गफार नामक उत्तर प्रदेशातील सहकाऱ्याच्या नावे केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी संबंधित एजंटला चौकशीसाठी पाचरण केले आहे. त्यानंतरच परदेशी नागरिकाला भाडेकरार करण्यासाठी जागा कशी देण्यात आली, यावर प्रकाश पडू शकेल. परदेशी नागरिक असल्याने जरीफ बाबाला स्थावर मालमत्ता खरेदी अथवा कोणाशी कायदेशीर आर्थिक व्यवहार करण्याचा हक्क नव्हता. त्यामुळे गफार याच्या माध्यमातूनच मालमत्ता खरेदीसह इतर आर्थिक व्यवहार होत होते. जरीफबाबा व गफार दोन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. वर्षभरापूर्वी ते वावीत राहायला आले, तेव्हा स्थानिकांच्या तक्रारीवरून वावी पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, अफगाणी निर्वासित असून, संयुक्त राष्ट्र संघामार्फत रेफ्युजी म्हणून भारतात आश्रय घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. स्थानिक पोलिसांनी यासंदर्भात राज्य तसेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनादेखील कळवले होते. या यंत्रणांनीदेखील चौकशी केली. कोणतेही गुन्हे दाखल नसल्याने कारवाई करणे टाळले होते. मात्र, त्यानंतरच्या काळात बाबा व त्यांच्या साथीदारांवर लक्ष ठेवणे गरजेचे होते.

Late Syed Zarif Chisti Baba and his residence in nashik district
शहर परिसरातील दुचाकी चोरीचे प्रकार सुरूच; पोलिसांना अपयश

राजस्थान, दिल्ली या भागात त्यांचे नियमित जाणे येणे असले तरी वास्तव्यासाठी वावीचीच निवड का केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिर्डीला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटक अथवा भाविकांच्या तो संपर्कात होता का, या दृष्टीनेदेखील तपास महत्त्वाचा ठरणार आहे. गफारच्या नावाने वावी परिसरात, तसेच इतरत्र कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे. या जमीन खरेदीची सरकारी मूल्यांकनाची रक्कम भारतीय नागरिकत्व गफारच्या नावे द्यायची व व्यवहारात ठरलेली उर्वरित रक्कम रोखीने दिली जायची. ही सर्व रक्कम जरीफ बाबाला मिळणाऱ्या देणग्यांमधून देण्यात येत होती. हा सर्व पैसा उभा करताना जरीफ बाबाच्या उत्पन्नाचे नेमके साधनदेखील तपासणे आवश्यक आहे. बाबाने वावी परिसराचीच निवड का केली, निर्जन ठिकाणी बंगला भाड्याने का घेतला, या प्रश्नांचीदेखील पोलिसांना उकल करावी लागणार आहे.

मेहुणी आल्यावर अधिक खुलासा होणार...

जरीफ बाबांची गर्भवती पत्नी दाऊदी तिरीना यांच्याशी संवाद साधण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षक रोहिणी कांगणे यांना भाषेचा अडसर आला. तोडक्यामोडक्या पारशी शब्दांचा अर्थ लावून पोलिसांनी दिल्लीत राहणाऱ्या तिच्या बहिणीशी संपर्क साधला. जरीफ बाबांच्या हत्येच्या घटनेबाबत तिला माहिती देऊन त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची सूचना केली. मात्र, जरीफ बाबांचे वडील वयोवृद्ध असल्याने ते मृतदेहाचा ताबा घेण्यासाठी भारतात येऊ शकणार नसल्याचे तिने सांगितले. अफगाणिस्तानच्या दूतावासमार्फतदेखील या दृष्टीने पोलिस बाबांच्या कुटुंबीयांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, गुरुवारी (ता. ७) उशिरापर्यंत तिरिना यांची बहीण वावीला पोचेल व त्यानंतरच बाबांच्या अंत्यविधीबाबत निर्णय होईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत ती पोहोचली नव्हती.

Late Syed Zarif Chisti Baba and his residence in nashik district
तंत्रमंत्र, जादुटोणा बुवाबाजी करुन सर्वसामान्यांची फसवणुक करणारा भामटा जेरबंद

तपासाची सूत्रे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे....

जरीफ बाबांच्या हत्येचा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आल्याने या घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील अप्पर अधीक्षक रोहिणी कांगणे मालेगावचे अप्पर अधीक्षक चंद्रकांत खांडवी हे स्वतः लक्ष घालून करत आहेत. त्यांच्या दिमतीला स्थानिक गुन्हे शाखेसह विशेष शाखेची पथके देखील आहेत. जरीफ बाबाचे वास्तव्य असलेल्या वावी येथील बंगल्या भोवती स्थानिक पोलिसांकडून सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांची पत्नी तिरीना या ठिकाणी आहे तोपर्यंत हा सशस्त्र बंदोबस्त असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.