समाजमन : ‘श्रीराम’ हे आदर्श व्यक्तिमत्त्व

गेल्या काही दशकात सर्वांत मोठ्या उत्सवाप्रमाणे घराघरांतून आनंद आणि हर्षोल्हासात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना साजरी करण्यात आली.
Shri Ram
Shri Ram esakal
Updated on

"हिंदू धर्मात अनेक देवदेवता आहेत; पण मर्यादा पुरुषोत्तम म्हणून सर्वमान्य अशा प्रभू श्रीरामांना विशेष महत्त्व आहे, ते समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्यात असलेल्या विविध गुणांमुळे त्यांना आदर्श राजा असेही संबोधले जाते. त्यांच्यातील लोककल्याणासाठी असलेली मानवता व सेवाभाव यामुळे हिंदू धर्मीयांसाठी प्रभू श्रीराम हे एक आदर्श देवता आहे. २२ जानेवारीला अयोध्या येथे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनानिमित्त संपूर्ण हिंदू धर्मीयांमध्ये एक उत्साहाचे व आनंदाचे वातावरण देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाहायला मिळाले. प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तमही म्हटले जाते. श्रीराम हे आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा प्रत्येक शब्द त्यांच्या कृतीतून प्रतिबिंबित होतो. मर्यादा पुरुषोत्तम या नावाला साजेसे असे व्यक्तिमत्त्व मानवजातीत हे एकमेव असावे."- ॲड. नितीन ठाकरे, नाशिक

(latest marathi article by adv nitin thackeray Shri Ram ideal personality nashik news)

गेल्या काही दशकात सर्वांत मोठ्या उत्सवाप्रमाणे घराघरांतून आनंद आणि हर्षोल्हासात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना साजरी करण्यात आली.

‘जय श्रीराम’च्या घोषणांनी संपूर्ण देश गर्जत होता. प्रभू रामचंद्रांचे चरित्र जर आपण अभ्यासले तर त्यांच्यातील अनेक गुणांचा आपणास साक्षात्कार होतो.

प्रभू श्रीरामांचे गुण व स्वभाववैशिष्ट्ये जर आपण आपल्या जीवनात अंगीकारली व आचरणात आणली तर आपण आपल्याबरोबर इतरांच्याही जीवनात आनंद व समाधान निर्माण करू शकतो.

प्रभू राम हा जगातील सर्वोत्तम पुत्र तसेच मोठा भाऊ आहे. एक आदर्श पती म्हणून त्यांना विशेष ओळखले जाते. कारण त्या काळात लोक बहुपत्नीत्वाचे पालन करीत होते. त्यांनी प्रत्येक नातं जपलं. आजच्या काळात हे श्रीरामांकडून शिकले पाहिजे.

आपापसात बंधुभाव, नाती जतन करण्याची कला आणि मानवाचे कल्याण कसे होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीराम होय.

राजपुत्र असूनही श्रीरामाचे चरित्र मधुरतेने भरलेले आहे. सामाजिक श्रेष्ठता, प्रतिष्ठा याचा थोडाही परिणाम त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात कधीही झालेला आढळत नाही. प्रभू श्रीराम हे लोकाभिमुख राजा होते. त्यांचे प्रत्येक कार्य हे लोककल्याणासाठी होते.

श्रीरामाची कार्यपद्धती कलियुगातही समर्पक आहे. आसुरी शक्तींचा नाश करून त्यांनी धर्माचे रक्षण केले. प्रभू श्रीरामाची पत्नी सीता हिचे रावणाने अपहरण केले. तेव्हा श्रीरामांसमोर सर्वांत मोठे संकट उभे राहिले होते. सीतेचा शोध घेण्यासाठी त्यांनी जंग-जंग पछाडले.

आपल्या बुद्धिमत्तेने आणि कौशल्याने त्यांनी सीतेचा शोध लावला. त्यानंतर त्यांनी सुग्रीवासाठी बालीचा वध केला आणि सुग्रीवाचा पाठिंबा मिळविला.

श्रीरामाने रावणाशी युद्ध केले, तेव्हा त्यांनी अयोध्येतून कोणतेही सैन्य घेतले नाही. त्यांनी वानर सेनेला एकत्र केले आणि एक प्रचंड सैन्य तयार केले, फक्त आत्मविश्वासाच्या जोरावर.

प्रभू रामांनी संतांना वाचविण्यासाठी राक्षसांचा वध केला. त्यांच्या कारकीर्दीत अत्याचार पीडितांविषयीचे त्यांचे प्रेम वेळोवेळी आपल्याला दिसून येते. जगप्रसिद्ध रघुकुळात जन्म घेऊनही श्रीरामांनी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजले नाही.

ते अतिशय सभ्य व नम्र होते. शबरीची बोरे स्वीकारताना त्यांची नम्रता आपणास दिसून येते. श्रीराम यांच्याकडे असीम शक्ती होती; पण त्यांनी तिचा रावणासारखा कधीही दुरुपयोग केला नाही. रावणाने आपली शक्ती दाखवली; पण रामाने प्रतिष्ठा आणि नम्रता दाखवली.

लोकशाही, जनमत आणि जनतेच्या हिताचा त्यांनी नेहमी विचार केला. श्रीरामाच्या कार्यपद्धतीचे दुसरे नाव ‘लोकशाही’ आहे. रामराज्यात कुणालाही विनाकारण शिक्षा झाली नाही की पक्षपात आणि भेदभाव नव्हता.

Shri Ram
समाजमन : सकारात्मक, संघटित युवाशक्तीचे बळ

श्रीराम हे धर्मप्रिय होते. अधर्माचा नाश करीत त्यांनी धर्माची स्थापना केली. त्यामुळे रामराज्य हे आदर्श ठरते. संयम आणि सौम्यतेचे प्रतीक या गुणांमुळे त्यांनी लोकांची मने जिंकली. वनवासाच्या काळात त्यांनी १४ वर्षे संयमाने वाट पाहिली.

प्रभू श्रीरामांचे चरित्र परिपूर्ण सामर्थ्य व त्यांच्या प्रेमाची शक्ती आणि जीवनातील त्यांच्या कार्यासाठी ओळखले जाते. संतुलन, संयम, सत्य, आज्ञापालन अशा अनेक गुणांमुळे प्रभू राम हे आपल्या सर्वांचे आदर्श आहेत.

प्रभू श्रीराम यांनी पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण या तिघांनीही संघ म्हणून एकत्र काम केले; पण नेतृत्व श्रीरामांच्या हाती राहिले; परंतु प्रभू श्रीरामांनी आपल्यासह सर्व लोकांना स्वावलंबी बनविण्यासाठी अशा अनेक संधी दिल्या, तर त्यांनी इतरांच्या हातात नेतृत्व दिले.

श्रीरामांची रणनीती, मूल्ये, विश्वास, प्रोत्साहन, श्रेय, इतरांचे लक्षपूर्वक आणि संयमाने ऐकणे आणि पारदर्शकता त्यांच्यासमोर ठेवली, ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती.

राम चरित्राचे आचरण ही काळाची गरज

प्रभू श्रीरामांसमोर अनेकदा संघर्ष व समस्या उद्‌भवल्या; परंतु समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांनी संयमाने काम केले आणि नंतर त्यावर काम सुरू केले. सीतेचे अपहरण, लक्ष्मण मूर्च्छा येण्यापासून त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला.

मात्र, त्यांनी यशस्वी मात केली. वानर, अस्वल अशा प्राण्यांना प्रेम व वात्सल्य देऊन त्यांना आपलेसे करणे आणि त्यांच्या जीवनात उत्साह निर्माण करणे हे श्रीरामांकडून शिकले पाहिजे.

त्याग माणसाला श्रेष्ठ आणि लोकप्रिय व आदर्श बनवितो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभू श्रीराम होय. म्हणूनच आपल्या जीवनात श्रीराम चरित्राचे आचरण ही काळाची गरज आहे.

(लेखक मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस, बार कौन्सिलचे अध्यक्ष; तर यशवंतराव चव्हाण सेंटरचेही अध्यक्ष आहेत.)

Shri Ram
राजवंश भारती : इक्ष्वाकू राजवंश (सूर्यवंश)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.