Nashik News: तंत्रस्नेही शिक्षक प्रकाश चव्हाण यांच्या स्मार्ट एज्युकेशन FLN Appचे लाँचिंग

‘डिजिटल खेळातून एफएलएन समृद्धी’ नावीन्यपूर्ण उपक्रम
Education Commissioner Suraj Mandre while launching Prakash Chavan's Smart Education FLN app at the National Education Conference organized by Kritishil Shiksha.
Education Commissioner Suraj Mandre while launching Prakash Chavan's Smart Education FLN app at the National Education Conference organized by Kritishil Shiksha.esakal
Updated on

Nashik News : कृतिशील शिक्षक महाराष्ट्र सेवाभावी प्रतिष्ठानमार्फत आयोजित ६ वे राष्ट्रीय शिक्षण संमेलनात शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या हस्ते तंत्रस्नेही शिक्षक प्रकाश चव्हाण यांच्या स्मार्ट एज्युकेशन एफएलएन ॲपचे लाँचिंग कोल्हापूर येथे करण्यात आले.

या वेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालक नेहा बेलसरे, माजी संचालक गोविंद नांदेडे, दिनकर टेमकर, तंत्रस्नेही विभागप्रमुख योगेश सोनवणे, संयोजक विक्रम आडसूळ आदी उपस्थित होते. (Launch of Smart Education FLN App by Tech Lover Prakash Chavan Nashik News)

तळागाळातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान वापरण्यात सक्षम करून डिजिटल खेळातून एफएलएन समृद्धी या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरवात ६ मेपासून दिंडोरी तालुक्यात गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

राज्यभरातील शिक्षकांना दरदिवशी सकाळी आठला नावीन्यपूर्ण इंटर ॲक्टिव्ह गेमची लिंक व्हॉट्सॲपद्वारे श्री. चव्हाण शेअर करतात. हा उपक्रम वर्षभर सुरू राहणार आहे. त्याचा वापर राज्यभरातील ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी व शिक्षक-पालक करीत आहेत.

गेल्या सात वर्षांपासून दर वर्षी किमान दोन ते तीन ॲप विद्यार्थ्यांसाठी तयार करून मोफत उपलब्ध करून देतात. या वेळी राज्य समन्वयक नारायण मंगलराम, ज्योती बेलवले, ज्ञानदेव नवसारे यांच्यासह जिल्ह्यातील प्रदीप देवरे, अबरार मणियार, हंसराज देसाई उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Education Commissioner Suraj Mandre while launching Prakash Chavan's Smart Education FLN app at the National Education Conference organized by Kritishil Shiksha.
Nashik News: धावत्या रेल्वेतून सेल्फी काढणे बेतली जीवावर; 16 वर्षीय मुलाचा मृत्यु

ॲपमध्ये काय आहे

डिजिटल खेळातून एफएलएन समृद्धी, फन मॅथ डिजिटल गेम, टॉप वर्कशीटस, दिवाळी सुटी डिजिटल खेळांशी गट्टी या चार टॅब असून, डिजिटल खेळातून एफएलएन समृद्धी या टॅबमध्ये वर्ड वॉल पोर्टलचा वापर करून विविध नावीन्यपूर्ण डिजिटल गेमचा समावेश आहे.

इंटरॲक्टिव्ह पद्धतीने खेळातून शिक्षण देण्याचे १२० गेम असून, लवकरच संपूर्ण वर्षभराचे गेम अद्ययावत होणार आहेत. डिजिटल गेम या टॅबमध्ये गणिताचा नावीन्यपूर्ण गेम समाविष्ट करण्यात आलेला आहे.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानासह एफएलएनचे उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार या क्रियांचा व मिश्र उदाहरणांचा समावेश करण्यात आलेला आहे.

वटवाघूळ गणितीपट्टी घेऊन खाली येईल ते उदाहरण मुलांनी वाचायचे आहे व मनातल्या मनात सोडवून उत्तर टाइप करून वटवाघूळवर अटॅक करायचे आहे. खेळता खेळता झटापट गणितीक्रिया करण्याचा सराव, अशी रचना करण्यात आलेली आहे.

"सध्या मुले मोबाईलवर सहज रमतात. पण खेळातून निखळ शिक्षण देण्यासाठी नवनवीन कल्पना साकार करतो. या ॲपचा नक्कीच विद्यार्थी व शिक्षक यांच्यासह पालकांना उपयोग होईल." - प्रकाश चव्हाण, ॲपनिर्मिती करणारे तंत्रस्नेही शिक्षक

Education Commissioner Suraj Mandre while launching Prakash Chavan's Smart Education FLN app at the National Education Conference organized by Kritishil Shiksha.
Wedding Custom : आधुनिक काळातही लग्नातील शिदोरी प्रथा टिकून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.