Laxman Savji : भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी भाजप कटिबद्ध

Laxman Savji
Laxman Savjiesakal
Updated on

"जगात ३६ देशात आज भारताचा रुपया चलन म्हणून स्वीकारला जात आहे. एवढंच काय रुपया आणि अमेरिकन डॉलर बरोबरीच्या किमतीचा होण्याचे आज आपण विश्वासाने स्वप्न पाहू शकतो. विकासाच्या प्रक्रियेत सर्वसामान्य जनतेचा सहभाग होण्याच्या प्रक्रियेने प्रचंड वेग घेतलेला आहे. बँका सर्वसामान्य जनतेच्या व्हाव्यात यासाठी बँकांचे राष्ट्रीयीकरण १९७१ साली तत्कालीन पंतप्रधान कै. इंदिरा गांधींनी केले व गरिबी हटावचा नारा दिला होता. घोषणा करून गरिबी हटत नाही. अंमलबजावणीसाठी कृतीची मानसिकता व तसे प्रामाणिक प्रयत्न हवे असतात. परंतु त्यासाठी २०१५ हे साल उजाडावे लागले. भाजपचे सरकार आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले."

- लक्ष्मण सावजी, प्रवक्ते, भाजप.

(Laxman Savji BJP determined to make India world guru nashik political news)

पंतप्रधान मोदी यांनी जनधन योजना आणली. झिरो बॅलन्सवर सामान्य जनतेचे बॅंकांना खाते उघडण्याची सक्ती केली. बँकांचे मॅनेजर गल्लोगल्ली फिरून जनतेला खाते उघडण्यासाठी आवाहन करू लागले. आज स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा बँकेत खाते उघडणाऱ्यांची संख्या ४८ कोटीपर्यंत पोचली.

आज रस्त्यावरील छोट्यात छोटा व्यावसायिक, भाजीवाले, हातगाडीवरील शेंगदाणे, फुटाणे विक्रेता, पाणीपुरीवाला, फुगे विक्रेता सुद्धा फोन पे स्वीकारतो. डिजिटल इंडियाचा हा चमत्कारच म्हणावा लागेल. बुरसटलेल्या सामाजिक रुढीमुळे, स्त्रीभ्रूण हत्यांमुळे आदी विविध कारणांमुळे मुलींचा कमी झालेला जन्मदर आज ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ यासारख्या योजनांद्वारे वाढलेला आहे.

मुलींसाठी, महिलांसाठी, घर कामगारांसाठी खासगी नोकरीतील, सरकारी नोकरीतील महिलांसाठी अनेक सवलती व उपाययोजना आणून समग्र स्त्री शक्तीचा सन्मान राखण्यासाठी जाणीवपूर्वक भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत.

पीकविमा योजना, दूरदर्शनवर स्वतंत्र वाहिनी, खत पुरवठ्यासाठी प्रयत्न, मृदा संधारण कार्ड, पाणी योजना, अवर्षणग्रस्त व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य यासाठी सरकारची जागरूकता जाणवते. नवउद्योजकांसाठी, आत्मनिर्भर भारतासाठी स्टार्टअप, स्टॅन्ड अप इत्यादी ठोस उपाययोजना तसेच मोठ्या उद्योगांची पायाभरणी यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Laxman Savji
Vikhe Patil : पांजरपोळ संस्थेला अधिक बळ देण्याची आवश्‍यकता : विखे- पाटील

आज युद्धसामग्री बनविणारा देश म्हणून भारताची ख्याती आहे. आयुष्यमान भारत योजनेद्वारे आरोग्याचा विमा देऊन सामान्य गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोठया संख्येने वैद्यकीय महाविद्यालये व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स उभारण्यात येत आहेत. नवीन शिक्षण प्रणाली येत आहे.

देशाची संस्कृती संवर्धनासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणले जात आहे. अतिदुर्गम भागात आश्चर्यकारक पूल व बोगद्यांची निर्मिती होत आहे. अतिजलद रेल्वे, सुसज्ज रेल्वेस्थानक, सुखकर प्रवास इत्यादीसाठी विशेष प्रयत्न होत आहेत. विमानतळाचा विकास, सुलभ प्रवास, सुरक्षा व्यवस्था, विमानसेवा वृद्धिंगत होण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत.

मुंबई ते दुबई समुद्रातून रेल्वे प्रकल्पाचा जागतिक उच्चांक होत आहे. भारतातून पाणी निर्यात होईल व तेल आयात होईल. धार्मिक पर्यटनासाठी विशेष प्रयत्न पंतप्रधान करत आहेत. परंतु सुमारे ६० वर्षं जबाबदार विरोधी पक्ष म्हणून राहिलेला आधीचा जनसंघ व आत्ताचा भाजप प्रचंड त्याग, तपस्या व बलिदान यामध्ये कसोटीला उतरलेला भाजप जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने, अभिमानाने, जबाबदार सत्ताधारी पक्ष म्हणून देशाला वैभवाप्रत नेण्यासाठी, भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी कटिबद्ध आहे.

Laxman Savji
BJP Foundation Day : परिवारवाद, वशंवाद हीच काँग्रेसची ओळख! भाजप वर्धापनदिनी मोदींचा हल्लोबोल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.