कथित नेत्यांची अजब जबरदस्ती! ओळखीच्या जोरावर लसीकरण; रांगेतील नागरिकांवर अन्याय

bytco hospital
bytco hospitalesakal
Updated on

नाशिक रोड : जुन्या बिटको रुग्णालयातील (bytco hospital) लसीकरण केंद्रावर पहाटे पाचपासून नंबर लावणाऱ्या नागरिकांवर अन्याय होत आहे. काही कथित नेते (leaders forcing for vacciantion) हस्तक्षेप करून ओळखीच्या नागरिकांना घुसवून लसीकरण करून घेत असल्याच्या तक्रारी (complaints) आहेत. त्यामुळे ज्येष्ठांमध्ये (senior citizen) संतापाची लाट पसरली होती. नंबरप्रमाणे लसीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

कथित नेत्यांकडून ओळखीच्या जोरावर लसीकरण; पहाटेपासून रांगा लावणाऱ्यांवर अन्याय

जुन्या बिटकोत कोविडचा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक पहाटेपासूनच रांग लावत आहेत. लसीकरण दहाला सुरू होते. दुपारी चारपर्यंत संपते. अनेकदा ते अडीचलाच बंद केले जाते. काही रूममध्ये नेऊन कथित नेते नातेवाईक, ओळखीच्यांना लसीकरण करून घेतात. ज्येष्ठ नागरिकांची दिशाभूल करून मनमानी करतात. वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय कर्मचाऱ्यांवर दबाव आणतात, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. सिन्नर फाटा केंद्रावर चार दिवसांपासून नंबर लावूनही लस मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. येथील केंद्रावर पोलिस, इतर सरकारी कर्मचाऱ्यांना लस दिली जात असल्याने स्थानिक लसीकरणापासून वंचित आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचारी यांच्यासाठी वेगळे नियोजन करावे, तसेच शहराबाहेरील नागरिक लसीकरण केंद्रावर येत आहेत, ते थांबवावे, अशी मागणी होत आहे.

bytco hospital
नाशिकमध्ये वाडा खोदकामात सापडला भुयारी मार्ग! विविध चर्चांना उधाण

पोलिस नेमण्याची मागणी

नाशिक रोडच्या काही लसीकरण केंद्रावर धमकावून लसीकरण करण्यात येत आहे. गर्दी कमी होईपर्यंत केंद्रावर पोलिस नेमण्याची मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे. सिन्नर फाटा आणि पंचक आरोग्य केंद्रावर सध्या गर्दी होत आहे. बिटको, सिन्नर फाटा, पंचक आरोग्य केंद्रावर काही जण दमदाटी करून ओळखीच्या २५ ते ३० जणांना रोज लस देण्यासाठी आणून लसीकरण करून घेत असल्याची तक्रार आहे. आरोग्य कर्मचारी या गावगुंडाना घाबरत असल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी केली जात आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन करूनही रोज नंबर लागत नाही. तीन-चार दिवसांपासून नागरिकांना रोज चकरा माराव्या लागत आहेत. लस मिळत नसल्याने नागरिकांचा संताप होऊन आपला रोष लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच व्यक्त करत आहेत.

bytco hospital
Nashik Lockdown : फळे, भाजी विक्रीच्या वेळेत वाढ; विभागीय अधिकाऱ्यांना आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.