Nashik Vegetables Rate: पालेभाज्या आवक वाढली, बाजारभाव कमी

vegetables rate
vegetables rate esakal
Updated on

Nashik Vegetables Market: गत आठवड्यात पाऊस सुरू होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने भाजीपाला आवक अधिक असून प्रमाणात झाली. त्यामुळे पालेभाज्यांचे दर कमी आहेत. (Leafy vegetable arrival increased market price low Nashik)

मुंबई व गुजरातमध्ये येथून भाजीपाला पाठविला जातो. यातील काही भाजीपाला व फळभाज्या स्थानिक, किरकोळ विक्रेते खरेदी करतात. सद्यःस्थितीत शहरालगतच्या मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव यांसह पेठ, सुरगाणा, सिन्नर भागातून भाजीपाला दाखल होतो. दिंडोरी रोडवर किरकोळ विक्रेत्यांकडे शेपू १०, कोथिंबीर ८ ते १०, मेथी १०, कांदापात १० ते १५ रुपये जुडीप्रमाणे विक्री होत आहे.

‘कृउबा’तील दर आणि आवक

कृषी उत्पन्न बाजार समितीत गावठी कोथिंबिरीला सरासरी पाचशे, तर सर्वाधिक तीन हजार पाच रुपये, चायना कोथिंबिरीला चारशे, सर्वाधिक अठराशे रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. मेथीला सरासरी पाचशे, तर सर्वाधिक दोन हजार प्रतिशेकडा दर मिळाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

vegetables rate
Dhule News: साखळी बंधाऱ्यांमुळे बोरी होणार बारमाही! 4 कोटींतून बंधारे आकारास

शेपूला पाचशे, तर सर्वाधिक चोवीसशे रुपये प्रतिशेकडा, तर कांदापातला सरासरी एक हजार, तर सर्वाधिक चार हजार सहाशे रुपये प्रतिशेकडा दर मिळाला.

गिलके (एक जाळी १० ते १३ किलो) पाचेशे ते सर्वाधिक साडेसहाशे रुपये, वांगी (एक जाळी दहा ते बारा किलो) ४८० ते ५५० रुपये, भरत वांगी (एक जाळी दहा ते बारा किलो) तीनशे ते सर्वाधिक पाचशे रुपये, टोमॅटो (वीस किलो एक जाळी) सरासरी १९०० तर सर्वाधिक २५०० रुपये दर मिळाला.

पावसाने उसंत घेतल्याने पालेभाज्या खराब मालाचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. आज आवक स्थिर असून, बाजारभाव देखील स्थिर आहेत. सर्व पालेभाज्या मिळून जवळपास तीन लाख पालेभाज्या आवक झाल्या आहेत.-चंद्रकांत निकम, संचालक, शिवांजली व्हेजिटेबल कंपनी तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक

vegetables rate
Nashik News: शासनाने टोल बंद करण्याची मागणी! रस्त्यांची डागडुजी करा; उद्योजक आणि प्रमुख 26 संघटनांचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.