Nashik News: ZP इमारतीत लिकेज जैसे थे! प्राथमिक शिक्षण विभागात मोठया प्रमाणात पाण्याची गळती

water leakage
water leakageesakal
Updated on

Nashik News : जिल्हा परिषद मुख्यालयातील इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी सुरू असताना देखील प्राथमिक शिक्षण विभागात स्लॅब लिकेजमुळे पाण्याची गळती होत आहे. शिक्षण विभागाच्या वरीत पाण्याची टाकी असल्याने तसेच पावसात विभागात पाणी गळते.

त्यामुळे येथील अधिकारी कर्मचारी यांना या पाण्यात बसून काम करण्याची नामुष्की ओढविली आहे. दुरुस्तीत लिकेज काढण्यात आले की नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (leaks in ZP building Massive water leakage in primary education department Nashik News)

जिल्हा परिषदेचे नवीन प्रशासकीय इमारत त्र्यंबकरोडवरील एबीबी सर्कल येथे मंजूर झाली असून त्याचे बांधकामही सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या पावसामुळे मुख्यालयातील इमारतीला मोठी गळती लागली होती.

मुख्यालयातील सामान्य प्रशासन विभागाबाहेरील स्लॅबचा काही भागही कोसळला होता. जुन्या सभागृहाबाहेरील भितींचा काही भाग कोसळला होता. अनेक विभागांमध्ये लिकेज असल्याने पाणी गळती सुरू होती.

त्यासाठी प्रशासनाने इमारतीची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बांधकाम विभागास सादर झालेले तीन प्रस्ताव फेटाळल्यानंतर ८५ लाख रूपयांचा दाखल झालेल्या प्रस्तावात दुरुस्ती करत महत्त्वाच्या दुरुस्त्यांसाठी प्रशासनाने घेत ५७ लाख रुपयांच्या दुरुस्ती प्रस्तावास मंजुरी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

water leakage
Nashik Sharad Pawar : शरद पवारांचे येवल्यातील ‘आशीर्वाद’चे परिणाम असतील मोठे : रोहित पवार

निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात इमारतींच्या रंगरंगोटीस प्रारंभ झाला. इमारतीवरील डागडुजी करण्याऐवजी थेट चुना लावण्यात आला. इमारतीस चुना लावण्याची ओरड झाल्यानंतर प्रमुख ठिकाणची डागडुजी करण्यात आली.

वास्तविक, इमारतीचे लिकेज काढण्यास प्राधान्य देऊन कामे होणे अपेक्षित होती. प्रत्यक्षात केवळ रंगरंगोटीवर भर दिला जात आहे. पावसाळा सुरू झाला असून अनेक विभागांमध्ये असणारी गळती जैसे थे दिसत आहे.

प्राथमिक शिक्षण विभाग तर, पाणी साचल्याचे दिसून येत आहे. या विभागाच्या वरील भागात पाण्याची टाकी आहे. त्यामुळे येथे पाणी गळतीचे प्रमाण आहे. यातच पावसाळ्यात अधिकच गळती होते.

त्यामुळे विभागातच पाणी साचले असते. यामध्ये कर्मचारी बसून काम करत असल्याचे बघावयास मिळत आहे. त्यामुळे लिकेज काढले की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

water leakage
NCP Ajit Pawar : नरडाण्यात शरद पवार समर्थकांचे आंदोलन; अजित पवारांचा निषेध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.