NMC News : LED दिव्यांचा लखलखाट पोचला लाखावर! पावणेदोन कोटी रुपयांची बचत

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

नाशिक : २०१६ पासून शहरात सुरू असलेला एलईडी दिवे बसविण्याचा प्रकल्प अखेर पूर्णत्वास येताना दिसत आहे. शहरात आतापर्यंत एक लाखांपर्यंत एलईडी दिवे बसविण्यात आले असून, सद्यःस्थितीत एकही सोडिअम फिटींग शिल्लक राहीली नसून जवळपास वर्षाला पावणेदोन कोटी रुपयांची विजेची बचत होत आहे. (LED lights spending reduced to lakhs Savings of 2 Crores Nashik NMC News)

महापालिकेच्या माध्यमातून सार्वजनिक- खासगी भागीदारीतून पथदीपांवर अस्तित्वातील सोडिअम दिव्यांऐवजी एलईडी दिवे बसविण्याचा प्रकल्प राबविण्यात आला. एलईडी दिवे बसविण्याचे काम टाटा प्रॉजेक्ट कंपनीला देण्यात आले होते.

प्रकल्प सुरू होत असताना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली. एस्क्रो खाते, पारंपरिक ऊर्जेवर होणाऱ्या खर्चाइतका रक्कम एस्क्रो खात्यात जमा करणे, विद्युत खांब बदलणे, गंजलेल्या पोलचा हिशोब न लागणे आदी कारणांमुळे प्रकल्प लांबणीवर पडला.

दिरंगाईमुळे कंपनीला ८२ लाखांचा दंडदेखील करण्यात आला होता. अडथळे पार करत सध्या प्रकल्प साकारण्यात आला आहे. शहरातील सहा विभागात ९९ हजार ९६४ फिटींग बसविण्यात आल्या असून, त्या माध्यमातून एक कोटी ७४ लाख ११ रुपये विजेची सूट मिळाली आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

NMC Nashik News
NIMA Power : ‘निमा पॉवर’मुळे नाशिकमध्ये मोठे उद्योग येणार : राधाकृष्ण गमे

काय आहे प्रकल्प?

प्रकल्पाची अंमलबजावणी आणि सात वर्षांच्या देखरेखीचा खर्च हा ऊर्जा खर्चात केल्या जाणाऱ्या बचतीमधून वसूल केला जात आहे. उदाहरणार्थ, जर रस्त्यांवरील दिव्यांसाठी आधीचा वीज वापराचा खर्च १०० रुपये होता आणि एलईडीमध्ये रूपांतर केल्यानंतर ऊर्जेवरील खर्च कमी झाला तर या प्रकल्पाचा खर्च ऊर्जेच्या खर्चात झालेल्या बचतीतून केला जात आहे.

या प्रकल्पानुसार दरवर्षी ३१ मिलियन केडब्ल्यूएच ऊर्जा बचत होण्याचे अंदाज आहे. ऊर्जा बिलात ६० टक्के बचत होईल. त्याचबरोबरीने वार्षिक देखरेख खर्चात जवळपास २ कोटी रुपयांची बचत होईल, असा दावा महापालिकेच्या विद्युत विभागाकडून करण्यात आला होता.

विभागनिहाय बसविलेल्या एलईडी फिटींग

विभाग एलईडी संख्या
पूर्व १३,३२४
नाशिक रोड १७,९८१
पंचवटी २३,२०९
पश्चिम ८,७०९
सिडको २१,४४६
सातपूर १५,२९८
-----------------------------------------
एकूण ९९,९६४

NMC Nashik News
MPSC Pre-Training : ‘एमपीएससी’ पूर्व प्रशिक्षणासाठी सोमवारपर्यंत मुदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.