Nashik News : सीबीएस चौकातील डावीकडचा मार्ग मोकळा

left lane at CBS Chowk started nashik news
left lane at CBS Chowk started nashik newsesakal
Updated on

Nashik News : स्मार्टसिटी कंपनीकडून सीबीएस चौकातील चारही चौकांमध्ये बंद करण्यात आलेली डावी वळणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून डावे मार्ग मोकळे करण्यासाठी पेव्हर ब्लॉक काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. (left lane at CBS Chowk started nashik news)

सीबीएस चौकात सिग्नलची डावी बाजू वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्याने डावीकडे जाणारी वाहने खोळंबतात. परिणामी डावीकडे उभी राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. डावी वळणे सुरू करण्यासाठी नाशिककरांकडून मागील दोन ते अडीच वर्षापासून सातत्याने स्मार्टसिटी प्रशासनासोबत निवेदनाच्या माध्यमातून पत्रव्यवहार सुरू होता.

स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांच्या सूचनेनुसार पेव्हर ब्लॉकने बंद करण्यात आलेली सिग्नलची डावी बाजू मोकळी काम सुरू झाले आहे. सिग्नलवरील डावी बाजू सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याबरोबरच या भागातील प्रदूषण कमी होणार आहे. श्री. मोरे यांनी तत्काळ दखल घेतल्याबद्दल नाशिककरांच्या वतीने वृक्ष व पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

left lane at CBS Chowk started nashik news
Phalke Smarak : फाळके स्मारकाच्या विविध शुल्कामध्ये दुप्पट वाढ! स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी

पेव्हर ब्लॉक हटवून रस्ते मोकळे केले जात असल्याने त्याचा आनंद म्हणून वाहनधारकांना खडीसाखर वाटण्यात आली. राजू देसले, निशिकांत पगारे, योगेश बर्वे, योगेश कापसे, प्रा. सोमनाथ मुठाळ, ॲड. प्रभाकर वायचळे, संजय निकम, अयाझ काझी आदी या वेळी उपस्थित होते.

"डावी वळणे सुरू करण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होती. ती अखेर पूर्ण झाली. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच प्रदूषण कमी होईल." - राजू देसले.

left lane at CBS Chowk started nashik news
Nashik News : 13 तालुक्यांत 1 मेपासून आपला दवाखाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.