Nashik News: गड, किल्ल्यांवर मद्यसेवन केल्यास कायदेशीर कारवाई

state excise department
state excise departmentesakal
Updated on

Nashik News : महाराष्ट्रातील गड, किल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.

अशा पुरातन वास्तूंच्या ठिकाणी कोणी मद्यसेवन करून गैरशिस्तीने वागल्याचे आढळून आल्यास महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नाशिकचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी दिला आहे. (Legal action if alcohol consumed at forts Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

state excise department
Nashik News: पिंपळगाव येथे आढळला दुर्मिळ पोवळा जातीचा साप!

या कायद्यान्वये पहिल्या अपराधास ६ महिन्यांपर्यंत सश्रम कारावासाची आणि १० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. त्यानंतरच्या अपराधास वाढीव शिक्षेची तरतूद आहे.

गड, किल्ले या ठिकाणी व्यक्ती मद्यसेवन करून गैरशिस्तीने वागताना आढळल्यास नागरिकांनी नाशिक अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या ०२५३-२५८१०३३ या दूरध्वनी क्रमांकांवर तसेच आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाच्या १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर व ८४२२००११३३ या व्हॉटस्‌ॲप क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक गर्जे यांनी केले आहे.

state excise department
Nashik: निमा पदाधिकाऱ्यांनी मांडला समस्यांचा पाढा; प्रश्न मार्गी लावण्याचे MIDCचे गवळी, झांज्जे यांचे आश्वासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.