Nashik Leopard News: ‘बिबट्या आला रे आला’! अफवा पसरविणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल; वन विभागाचा इशारा

A photo of a leopard found on Jaibhavani Road went viral. The forest department has said that this photo is from the other side.
A photo of a leopard found on Jaibhavani Road went viral. The forest department has said that this photo is from the other side.esakal
Updated on

Nashik Leopard News : आपल्या परिसरात बिबट्या आल्याची माहिती किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांविरोधात आता थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. नागरिकांना सतर्क करण्याच्या नावाखाली त्यांच्यात भीती पसरविली जात आहे.

अशा अफवांना तोंड देताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही नाकीनऊ आले आहे. (Leopard case filed against spreading rumours Warning of forest department nashik)

नाशिक रोड भागातील जय भवानी रोडवर रविवारी (ता. २३) बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केला होता. त्यानंतर बिबट्या अद्याप या भागात दिसलेला नाही. या घटनेचा आधार घेऊन एका युवकाने झाडावर बसलेल्या बिबट्याचा फोटो व्हायरल केला.

फोटोमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली व त्यांनी वन विभागाला फोन केला. वन विभागाच्या पथकाने या भागाची पाहणी केली. पण बिबट्या अस्तित्वात नसल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले.

यांसारख्या घटना वारंवार घडत असल्याने नाशिक रोड भागतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर देखील विनाकारण कामाचा ताण वाढला आहे.

जय भवानी रोडवर दिसलेला बिबट्या आर्टिलरी सेंटरच्या हद्दीतील जंगलात गेल्याची खात्री वन विभागाला पटली आहे. लष्करी हद्दीतील जंगलात तो दिसून आल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

यामुळे आता जयभवानी रोड भागात बिबट्याचा संचार नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A photo of a leopard found on Jaibhavani Road went viral. The forest department has said that this photo is from the other side.
Nashik Crime: चाणक्यपुरीत एकावर प्राणघातक हल्ला

सायबर पोलिसांच्या मदतीने गुन्हे

बिबट्या आल्याची अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींविरोधात आता थेट फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभाग सायबर पोलिसांची मदत घेत आहे. ज्या व्यक्तीने फोटो व्हायरल केला त्यालाच त्या ठिकाणाची ओळख पटवून द्यावी लागणार आहे.

"एखाद्या व्यक्तीला बिबट्या दिसल्याची खात्री वाटत असेल, तर त्याने १९२६ या क्रमांकावर निःसंकोचपणे फोन करावा. आम्ही त्याची खात्री करून घेऊ. विनाकारण जुने फोटो, व्हिडिओ पाठवू नये. त्यांच्याविरोधात आम्ही कारवाई करणार आहोत."

- वृषाली गाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नाशिक पश्चिम

A photo of a leopard found on Jaibhavani Road went viral. The forest department has said that this photo is from the other side.
Nashik News: अमली पदार्थांविरोधात पोलिस आक्रमक; महिनाभर विशेष अभियान राबविणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.