उसतोडी दरम्यान आढळले बिबट्याचे पिल्लू; उसतोड कामगार सैरभैर 

Leopard cub
Leopard cubesakal
Updated on

अंबासन (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील गोराणे येथील शेतकरी मधुकर पंडित देसले यांच्या शेतातील उसतोड सुरू असतानाच बिबट्याचे पिल्लू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत बिबट्याच्या पिलाला ताब्यात घेतले आहे. सायंकाळी या पिलाला पुन्हा मादिच्या स्वाधिन करणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र आधिकारी प्रशांत खैरनार यांनी दिली.

शेतकऱ्यांना अनेदा होते बिबट्याचे दर्शन

परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याने अनेक ठिकाणाहून शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत आहे, तसेच शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ले चढवत असून वनविभागाकडून पाहिजे तसा बंदोबस्त होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. गोराणे येथील शेतकरी मधुकर देसले यांची आसखेडा शिवारात गट क्र.३९४ मधील दोन एकरात ऊस लागवड केली आहे. आधीच उसतोडीला उशिर झाला असतानाच उसतोडी दरम्यान बिबट्याचे पिल्लू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याचे पिल्लू आढळून येताच उसतोड कामगार सैरभैर झाले होते. याबाबत गावात माहीती मिळताच बघ्यांची गर्दी उसळली. सटाणा वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दाखल होत पिलाला ताब्यात घेऊन एका प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये ठेवले. शेतात सुरू असलेली उसतोड थांबण्यात आली असून सायंकाळी पुन्हा त्याच ठिकाणी कॅमेरे लावून पिलाला मादीच्या स्वाधिन केले जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र आधिकरी प्रशांत खैरनार यांनी सांगितले.

Leopard cub
एसटी संप जीवावर बेतला! आणखी एका कर्मचाऱ्याची आत्महत्या
Leopard cub
नाशिक जिल्ह्यात 9 हजार मुलांना एकाच दिवशी पहिली लस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()