Nashik Leopard News: नायगाव खोरे भागात दोन ठिकाणी बिबट्याने केली 4 शेळ्यांची शिकार

Naigaon (T.Sinnar) Find and catch leopard in the campaign in the field near primary health center on Jongaltembi road, a newly constructed cage of six cages with food for leopards.
Naigaon (T.Sinnar) Find and catch leopard in the campaign in the field near primary health center on Jongaltembi road, a newly constructed cage of six cages with food for leopards.esakal
Updated on

वडांगळी : नायगाव खोरे भागात वनविभागाची बिबट्या शोधा अन् पकडा मोहीम सुरू असताना बिबट्याने वनखात्याला चकमा देत दोन हल्यात चार शेळ्या फस्त करत सावज हेरले.

देशवंडी (ता.सिन्नर) व नायगाव शिवारात हद्दीत ह्या दोन ठिकाणी बिबट्याने शिकार केली आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्या दोन त्यांचे बछडे असेल असा वनविभागाचा अंदाज आहे.

शिवारात व्यक्तींवर बिबट्याचा हल्ले अन् बिबट्याने शेळ्या फस्त करण्याच्या घटनेने रात्री आम्हां बिबट्या हल्लाची दहशत निर्माण झाली आहे. नायगावसह खोरे तील सात गावे बिबट्या दहशतीच्या छायेखाली वावरत आहे. (Leopard hunted 4 goats at two places in Naigaon khore nashik news)

नायगावसह जोंगलटेंभी देशवंडी बाम्हणवाडे जायगाव वडझिरे सोगगिरी ह्या गावांची मुख्य बाजारपेठ नायगाव आहे. नायगावहून नाशिकरोड सिन्नर सायखेडा निफाडला जाण्याची संख्या जास्त आहे.

त्यात माळेगावच्या औद्योगिक वसाहतीत कामगारांसह वाहने जात आहे. नायगावला सायंकाळी जी व्यावसायिक वर्दळ बिबट्या दहशतीच्या छायेखाली आहे. त्यात शनिवारी चा आठवडे बाजार बिबट्याने लक्ष्य केले आहे.

गोदावरीचा संगम ऊसाचे वाढलेले क्षेत्र अन् नायगाव खोरे वनविभाग क्षेत्र बिबट्याचे नैसर्गिक अधिवास आहे. संगमाच्या बाजूने बिबट्या नायगाव मानवी वस्ती घुसत आहे. नायगावला चार दिशांना जे छोटे मोठे रस्ते आहे. सात गावांसाठी आहे. ते बिबट्याने हल्ल्याचे ठिकाण बनविले आहे.

सिन्नर वनविभागाने बिबट्या शोधा अन् पकडा मोहीम सुरू केली. त्यांची व बिबट्या प्रभावित क्षेत्रात सकाळ प्रतिनिधीनीं पाहणी करून थेट ग्रामस्थांशी संवाद साधला आहे.

सहा ठिकाणी पिंजरे उभारणी झाली आहे. रात्रीचा ड्रोन कॅमेरा सर्व्ह दोन दिवस झाला आहे. दोन ठिकाणी वेब कॅमेरा बसविला आहे. पण वनविभागाच्या मोहिमेपेक्षा बिबट्या शातीर ठरला आहे.

बुधवारी ता.4 रात्रीच्या वेळीस देशवंडीचे भगवान बर्के यांच्या तीन शेळ्या व सायखेडा रोडला त्र्यंबक भांगरे यांची शेळीची शिकार बिबट्यांनी केली. त्यामुळे मादी नर बिबट्या सह त्यांची बछडे असेल असा अंदाज वनविभागाच्या व्यक्त केला आहे.

Naigaon (T.Sinnar) Find and catch leopard in the campaign in the field near primary health center on Jongaltembi road, a newly constructed cage of six cages with food for leopards.
Nashik Leopard News: वडांगळीला निंबाच्या झाडावर बिबट्यांची मस्ती; महामार्गावर सावज हेरण्याचा प्रयत्न; पहा Video

वनविभागाने सहा पिंजरे सह आधी दोन पिंजरे उभारले आहे. त्यात काही पिंजरा बिबट्या भक्ष्य नाही. रिकामे पिंजरे कशाला पाहिजे. त्यात भक्ष्य ठेवा ना असे स्थानिकांचे म्हणे आहे. काही बिबट्या बिबट्या साठी भक्ष्य शेळ्या ऐवजी कोंबड्या ठेवलेल्या आहे.

बिबट्याने त्या सापळ्याकडे न जाता चार शेळ्यांची शिकार केली. त्यामुळे शिवारात आज बिबट्याची दहशत अधिक वाढली आहे. नायगाव खोरे तील सात गावात शेती मुख्य व्यवसाय आहे. ज्यांनी बिबट्या पाहिला येथील शेतमजूर शेतातून पळून गेले आहे.

जोंगलेटेंभीचे संगीता काळे, हिरामण मोरे, नायगावचे विष्णू तुपे, शाळकरी जोगलेटेंभीचे शुभम राजेंद्र ताठे, नायगावचा नारायण पाबळे, लखन सिंह, सावळीचे सैन्यातील जवान शिवाजी चाटे, यांच्या पत्नी प्रगती चाटे यांच्यावर बिबट्याने हल्ले करून जखमी केले आहे. ह्या सर्व जखमीनी स्व खर्चाने औषधे उपचार केले आहे. सिन्नर वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामे केले आहे.

"बिबट्याने नायगाव च्या सर्व गावात हल्ले केले आहे. लाल कांद्याची लागवड करताना ऊसाच्या क्षेत्रालगत कांदे लागवडीला धास्ती घेतली आहे. बिबट्यांना लवकर पकडले पाहिजे."

-सुनिता पानसरे, शेतकरी महिला, नायगाव

"पहिल्यांदी आमच्या शेती शिवारात दोन बिबटे सर्वांनी पाहिले. त्यावेळी वनखात्याने पिंपळगाव निपाणी रस्ताला बिबट्याने आता पुन्हा शेळी खाल्ली आहे. बिबट्याने वनविभागाची मोहीम सुरू असताना जागा बदलून पाळीव प्राणी लक्ष केले आहे."

-मंगेश कातकाडे, युवा शेतकरी, पिंपळगाव निपाणी रस्ता, नायगाव

"नायगाव खोरे भागात दोन वेब कॅमेरे व नव्याने सहा पिंजरे उभारले आहे. रात्रीच्या हल्ल्यात दोन ठिकाणी शिकार झाली आहे. त्यामुळे दोन नर मादी बिबटे असण्याची शक्यता आहे.....

- संजय गिते, वनरक्षक, नायगाव

Naigaon (T.Sinnar) Find and catch leopard in the campaign in the field near primary health center on Jongaltembi road, a newly constructed cage of six cages with food for leopards.
Nashik Leopard News: बिबट्याचे एकाच रात्री दोन हल्ले; शाळकरी मुलगा अन जवानाची पत्नी जखमी, परिसरात दहशत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.