नाशिक : अंबोली घाटात बिबट्याच्या कातडी विक्रीचा तस्करांचा डाव उधळल्याची घटना ताजी असतानाच इगतपुरी- नाशिक- ननाशी वनपरिक्षेत्राच्या पथकाने पेठ महामार्गावर रचलेल्या सापळ्यात बिबट्याची कातडी विक्री करणाऱ्या दोघा जणांना अटक केली आहे. आंबेगण फाट्यावर वनविभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यात तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची बाब पुन्हा उघड झाली आहे. सदर कातडी ही पाच महिन्याच्या बछड्याची असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. (Leopard Skin Selling exposed by forest department 2 suspects jailed Nashik crime Latest Marathi News)
ननाशी वनपरिक्षेत्रात बिबट्याची कातडी विक्री केली जाणार असल्याची गोपनीय माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.त्यानुसार पथकाने आंबेगकण फाट्यावर बनावट ग्राहक तयार करून संयुक्त सापळा रचला. सदर बिबट्याची कातडी तस्करांसह वनविभागाच्या बनावट ग्राहक यांनी केलेल्या संभाषणात ११ लाख रुपयात खरेदी करण्याचे ठरले.
या वेळी बिबट्याची कातडी व्रिकीसाठी घेऊन आलेला संशयित मोतीराम महादू खोसकर (३५, रा.आडगाव देवळा, ता. त्र्यंबकेश्वर), सुभाष रामदास गुंबाडे (३५, रा. पाटे, ता. पेठ) यांना कातडीसह रंगेहाथ ताब्यात घेत त्यांच्याकडील कातडी जप्त केली.
मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, पोपट डांगे, रूपेश दुसाने, वनरक्षक विठ्ठल गावंडे, गौरव गांगुर्डे, फैज अली सय्यद, मझहर शेख, गोरख बागूल, कैलास पोटींदे, चिंतामण गाडर, शरद थोरात, राहुल घाटेसाव, उत्तम पाटील, विजय पाटील, प्रकाश साळुंखे वाहनचालक नाना जगताप, मुज्जू शेख, सुनील खानझोडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांकडून बिबट्याची संपूर्ण कातडी जप्त करण्यात आली आहे. ननाशी वनपरिक्षेत्र अधिकारी सविता पाटील या करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.