इगतपुरी शहर (जि. नाशिक) : बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले असून, तस्कर आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी हवेत गोळीबार करत तस्करांना जेरबंद केले. पथकाने त्यांच्याकडून कातडी आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. सर्व तस्कर हे मोखाडा (जि. पालघर) येथील आहेत. (Leopard skin smugglers racket exposed Smugglers in Amboli ghat clashes forest department Nashik Latest Marathi News)
बिबट्याची कातडीची तस्करांकडून विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती इगतपुरी वनपरीक्षेत्राचे अधिकारी केतन बिरारी यांनी मिळाली होती. त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम वन विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार श्री. बिरारी यांनी बनावट ग्राहक बनून तस्करांशी संपर्क साधला.
तस्करांनी बिबट्याच्या कातडीच्या मोबदल्यात १८ लाख रुपयांची मागणी केली. १७ लाखांमध्ये हा व्यवहार ठरला. यानंतर श्री. बिरारी यांनी पैसे मिळाल्यानंतर तस्कर यांच्याशी संपर्क साधत भेटण्यासाठी वेळ घेतली. त्यानंतर तस्कर यांनी बिरारी यांना दुपारी तीनला अंबोली घाटात कातडी घेण्यासाठी बोलावले.
इगतपुरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचला. पैसे देण्यापूर्वी बिरारी यांनी कातडी दाखविण्याची मागणी केली. त्यानंतर तस्कर यांनी कातडी दाखविल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांची खातरजमा केली. कातडी ही बिबट्याची असल्याचे कळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तस्करांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
आपण अडकलो असल्याचे तस्करांना कळताच त्यांनी वन विभाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दगडफेक करत त्यांच्याशी झटापट केली. प्रसंगावधान राखून वनपरीक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांनी आपल्याजवळील पिस्तूल काढत हवेत गोळीबार केला. त्याचवेळी त्र्यंबकेश्वर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
अखेर तस्करी करणाऱ्या प्रकाश राऊत (वय ४३, रा. रांजणगाव), परशुराम चौधरी (३०, रा. चिंचुतारा), यशवंत मौळी, हेतू मौळी (३८, दोघे रा. कुडवा) सर्व रा. मोखाडा यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. या प्रकरणी अन्य संशयित लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार आहे, अशी माहिती श्री. बिरारी यांनी दिली. अशीच घटना २००८ मध्ये घडली होती. तत्कालीन वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनीही अशीच उल्लेखनीय कामगिरी करून तस्कर ताब्यात घेतले होते.
ही कामगिरी पश्चिम वन विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे वनपरीक्षेत्र अधिकारी केतन बिरारी, वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, शैलेश झुटे, पोपट डांगे, सचिन दिवाने यांच्यासह वनरक्षक फैजअली सय्यद, आर. टी. पाठक, मुज्जू शेख, गुव्हाडे, पी. डी. गांगुर्डे, जी. डी. बागूल, विठ्ठल गावंडे, एस. पी. थोरात, सी. डी. गाडर, राहुल घाटेसाव, त्र्यंबकेश्वर प्रादेशिक वनक्षेत्रातील वनरक्षक संतोष बोडके, वनपरिमंडळ अधिकारी ए. एस. निंबेकर, एम. ए. इनामदार, मधुकर चव्हाण, वनरक्षक एन. ए. गोरे, के. वाय. दळवी, एस. ए. पवार, वाहनचालक मुज्जू शेख यांनी सहभाग घेतला.
चारवेळा बदलले ठिकाण
बिबट्याच्या कातडी व अवयवाची तस्करी करणाऱ्या या चौघा तस्करांवर मागील एक महिन्यापासून वन विभागाचे पथक नजर ठेवून होते. त्यानंतर या चौघाकडे बिबट्याची कातडी असून, ते विक्री करणार असल्याचे कळताच अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी बनावट ग्राहक म्हणून संपर्क केला.
वन विभागाकडून बनावट पैसे बॅग तयार करण्यात आली. जेव्हा केतन बिरारी यांनी भेटण्यासाठी संपर्क केला असता, प्रथम तस्कर यांनी इगतपुरी येथे बोलावले, त्यानंतर वैतरणा येथे येण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा एकदा तस्कर यांनी ठिकाणी बदलत अखेर अंबोली घाटात ही भेट झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.