वडांगळी : येथील शिवारात ओझर शिर्डी महामार्गावरील कोमलवाडी फाटाजवळ खडकी नाल्यांच्या निंबाच्या झाडावर बिबट्याच्या जोडीने मुक्तपणे मस्ती केली आहे. या बिबट्याने महामार्गावरील दुचाकी वरील सावज हेरण्याचा प्रयत्न केला. पण चार चाकी गाडीच्या वर्दळीने तो प्रयत्न असफल झाला आहे.
ह्या भागातील चिंकूच्या बागेत नर मादीसह त्यांच्या दोन बछडे यांचा मुक्कामीची राहुटी आहे. गणेशोत्सवाच्या सांगतेपुर्वी बुधवारी ता. 27 ला रात्री दहाच्या सुमारास बिबट्याचा निंबाच्या झाडावर मुक्त विहार मोबाईल कॅमेरात बंदिस्त झाला आहे. (Leopards have fun on lemon tree at Wadangali Trying to spy on public on highway nashik)
कोमलवाडीचे शेतकरी संदीप घुले राजू जोरी यांनी चारचाकी गाडीतून मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आहे. येथील सायखेडा रस्ता खडकी नाला व कासार नाला वळणावर शेतकरी सुदेश खुळे यांचा चिकूची बाग आहे.
त्या समोर निंबांचे झाड व छोटे खाणी घर शेतकरी शिवाजी खुळे यांचे आहे.वडांगळीचे माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या ग्रामस्थांना चिकूच्या बागेत बिबट्या बहुतेक वेळा दिसला आहे. त्यात शाळेच्या स्कूल बस वाहनधारकांना बिबट्या नजरेस पडला आहे.
पण कोणी विश्वास ठेवत नव्हते. गणेशोत्सवाच्या काळात बुधवारी आठवडे बाजार असल्याने मोठी वर्दळ असते. यावेळी रात्री दहाच्या सुमारास बिबट्या चिकूच्या बागेत आश्रय ठिकाणाहून महामार्गावर सावज हेरण्याचा प्रयत्न करत होता.
त्यावेळी कोमलवाडीहून बाबुराव दौड मोटारसायकल हुन जात होते. त्यांच्यावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला. पण मोठ्या वाहनांच्या प्रकाशाने त्यांची हालचाल मंदावली. त्यावेळी वडांगळीहून संदीप घुले राजू जोरी घराकडे जात होते.
त्यांना चार बिबट्या चिकूच्या बागेतून महामार्गावर पलीकडे निंबाच्या झाडावर चढताना दिसले. त्यांनी हे दुश्य पाहुन धडकी भरली. त्यांनी स्पीड ब्रेकर जवळ गाडीचा वेग कमी केला. गाडीच्या दिव्यामध्ये चार बिबटे निंबाच्या झाडावर चढले. ते मुक्त पणे मस्ती करत होते.
महामार्ग शांतपणे होण्याची वाट पाहत न्याहाळत होते. ह्या बिबट्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. त्यात बिबट्याला हाॅर्न दिला की निंबाच्या फांद्या वरून दुसरा फांदीवर जात आहे. फांदीवर बसलेल्या बछड्यांकडे जाताना दिसत आहे.
असे दोन व्हिडिओ चित्रीकरण करून ते व्हायरल झाले आहे. कासार नाला व खडकी नाला ह्या दोन नाल्यांच्या मध्यभागी निंबांचे झाड व चिकूची बाग आहे. त्यात दोन्ही नाल्याजवळ पाणीसाठा व दाट झाडी असल्याने वन्यजिवांचा वावर वाढला आहे.
"गणेशोत्सव विसर्जनाच्या आदल्या रात्री चार बिबटे निंबाच्या झाडावर चढताना पाहिले. त्या आधी मोटारसायकल स्वार हल्ला पासून वाचला आहे. आम्ही चार चाकी गाडी तून मोबाईल मध्ये व्हिडिओ तयार केला. गाडीच्या काचा बंद होत्या. पण धडकी भरली होती."
- राजू जोरी, शेतकरी, कोमल वाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.