Nashik News : इन्फ्रास्ट्रक्चर कार्पोरेटचे, मनुष्यबळाच्या नावे ठणठणाट; महापालिकेच्या रुग्णालयांची स्थिती

dr zakir hussain hospital
dr zakir hussain hospitalesakal
Updated on

Sakal Exclusive : नाशिक रोडच्या महापालिकेच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात गेल्यावर मेट्रो सिटीमधील कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये आलो की काय असे वाटते. परंतु रुग्णालयात डॉक्टर व अन्य स्टाफचा आकडा बघितल्यास नगरपरिषदेपेक्षा वाईट स्थिती असल्याचे दिसते.

जवळपास २२ लाख लोकसंख्येच्या नाशिक शहरात महापालिकेचे पाच मोठे रुग्णालये व तीस आरोग्य केंद्रे आहेत. त्याशिवाय आपला दवाखाना अंतर्गत १०६ उपकेंद्र मंजूर करण्यात आले असून, यात ९६ प्रस्ताव प्रगतिपथावर आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलचे उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्चर कार्पोरेट हॉस्पिटलच्या कित्येक पटीने अधिक आहे. परंतु डॉक्टर व त्यांना सहाय्यक अन्य पदांचा तक्ता रुग्णालयाच्या भव्यता झाकून टाकतो. (less number of doctors in municipal hospitals than required in nashik news)

सद्यःस्थितीत डॉक्टर व अन्य सहाय्यकांची एक हजार ५०६ पदे मंजूर आहे. यातील ७८६ पदे कार्यरत आहे, तर ७२० पदे रिक्त आहेत. नाशिक रोडचे ठाकरे रुग्णालय उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठे आहे. कोविडकाळात या रुग्णालयाने नावलौकीक मिळविला.

चोवीस तास चालणारा कॅज्युलिटी व अस्थिरोग विभाग, अतिगंभीर रुग्णांसाठी आयसीयू, सर्जिकल वॉर्ड व जळीत वॉर्ड, चार ऑपरेशन थिएटर्स, प्रसूती विभाग सेवा व शस्रक्रिया, पेडियाट्रिक वॉर्ड, जनरल वैद्यकीय विभाग, बाह्यरुग्ण विभाग, पॅथॉलॉजी लॅब, ब्लड बँक एक्स- रे व सोनोग्राफी विभाग, सीटी स्कॅन विभाग एवढ्या सोयीसुविधा रुग्णांसाठी आहे.

जवळपास अडीच लाख चौरस फूट क्षेत्र असलेल्या या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. परिणामी अन्य रुग्णांचा ताण उपलब्ध डॉक्टरांवर येतो. त्यामुळे किमान रिक्त पदे तरी भरण्यास शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

dr zakir hussain hospital
SAKAL Exclusive: संगणकासह संलग्न शाखांकडेच कल! सिव्हि‍लच्‍या 59 टक्‍के, मॅकॅनिकलच्‍या 48 टक्‍के जागा रिक्‍त

महापालिकेची रुग्णालये

- हिंदुह्णदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय (नाशिक रोड)

- डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय (कठडा, द्वारका)

- इंदिरा गांधी रुग्णालय (पंचवटी)

- श्रीस्वामी समर्थ रुग्णालय, मोरवाडी (सिडको)

- मायको सातपूर दवाखाना (सातपूर)

एकूण मनुष्यबळ

- सार्वजनिक आरोग्य विभाग रुग्णालय ( कायम, मानधन व बंदपत्रित) मंजूर पदे ९३३, कार्यरत ४७०, रिक्त ४६३.

- राष्ट्रीय आरोग्य अभियान- मंजूर ४४०, कार्यरत २३५, रिक्त २०५.

- राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम- मंजूर ३४, कार्यरत ३२, दोन रिक्त.

- राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम- मंजूर ९९, कार्यरत ४९, रिक्त ५०.

dr zakir hussain hospital
Sakal Exclusive : महसुली गावांच्या विकासासाठी अवघे 87 कोटी; NMRDA बँक खात्याची स्थिती

रुग्णालयातील खाटांची संख्या

- बाळासाहेब ठाकरे रुग्णालय- २००

- डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय- ५०

- इंदिरा गांधी रुग्णालय- ५०

- श्री. स्वामी समर्थ रुग्णालय- ५०

- मायको सातपूर दवाखाना- ५०

शहरी आरोग्य केंद्रातील खाटा

वडाळा गाव- २०, गंगापूर २५, जिजामाता २५, मुलतानपुरा १५, दसकपंचक २०, उपनगर २०, सिन्नर फाटा १५, पंचवटी १५. (एकूण- १५५)

खाटा नसलेले शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

संत गाडगे महाराज, भारतनगर, बजरंगवाडी, संजीवनगर, एमएचबी कॉलनी, सिडको, सिव्हिल हॉस्पिटल बारा बंगला, कामटवाडा, रामवाडी, मोरवाडी, रेड क्रॉस, अंबड, पवननगर, पिंपळगाव खांब, म्हसरूळ, मखमलाबाद, तपोवन, हिरावाडी, नाशिक रोड, वडनेर दुमाला, गोरेवाडी.

dr zakir hussain hospital
Ashram School Teacher Exam : आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांची 17 सप्टेंबरला परीक्षा; आदिवासी विकास विभागाचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.