Leucistic Owl : चुंचाळे शिवारातील श्री नाशिक-पंचवटी पांजरपोळच्या जैवविविधता क्षेत्रात ‘ल्युसिस्टिक’ पिंगळाचे दर्शन झाले. तीस हजार पक्ष्यांमध्ये एक ‘ल्युसिस्टिक’ असल्याचे पांढऱ्या रंगाच्या घुबडांच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे.
दर वर्षी नोंदविलेल्या साडेपाच दशलक्ष पक्ष्यांपैकी २३६ ल्युसिझम अथवा अल्बिनिझम पक्षी होते. जगात घुबडांच्या २५० प्रकारच्या प्रजाती आहेत. त्यातील ३१ प्रजाती देशात, तर नाशिकमध्ये आठ प्रजाती मिळतात. (Leucistic Owl One in 30000 such rare leucistic Owl seen in Chunchale Panjarpol nashik news)
ठिपकेदार पिंगळा हा भारतीय घुबड प्रजातींच्या पक्ष्यांपैकी आकाराने सगळ्यात लहान पक्षी आहे. तो मानवी वसाहतीजवळ राहणे पसंत करतो. पिंगळा पक्षी आकाराने साधारणपणे मैना पक्ष्याएवढा २१ सेंटीमीटर असतो.
त्याचा मुख्य रंग करडा-तपकिरी असून, त्यावर पांढरे ठिपके असतात. ठिपक्यांवरूनच त्याला ठिपकेवाले घुबड असे म्हणतात. सर्व घुबडांप्रमाणे पिंगळा आपली मान दोन्ही बाजूंनी १८० अंश फिरवू शकतो. त्यामुळे एका जागी बसला असताना तो क्षणात त्याच्या मागे काय घडत आहे ते पाहू शकतो.
अंधारात राहण्यासाठी कान आणि डोळे अनुकूल झाले असल्याने कमी आवाजाच्या दिशेने पिंगळा रोखून पाहतो. पिंगळा पक्षी देशात सर्वत्र, तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमारमध्ये आढळतो.
त्याच्या रंग आणि आकारावरून तीन उपजाती आहेत. दिवसा जुन्या आमरायांमध्ये, झाडांच्या ढोलीत, तसेच संधी असल्यास जुन्या मोठाल्या घरातील छताच्या आश्रयाने राहणे पसंत करतो.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
पिंगळा हा निशाचर पक्षी असल्याने तो रात्रीच्या वेळी लहान बेडूक, पाली, उंदीर आणि लहान प्राण्यांची छोट्या पिलांची शिकार करतो. साधारणपणे नोव्हेंबर ते मार्च हा काळ पिंगळा पक्ष्याचा विणीचा काळ आहे. पिंगळा सूर्यास्ताच्या वेळी अथवा पहाटे दिसतो.
पिंगळा काव्यरचना
पिंगळा महाद्वारीं । बोलि बोलतों देखा ।।
डौर फिरवीतों । डुग डुग ऐका ।।
संत एकनाथ यांनी पिंगळाविषयक काव्यरचनेतील या ओळी आहेत.
"मी पांजरपोळमध्ये राहतो. माझ्या घराशेजारी चिंचेच्या झाडावर दोन दिवसांपूर्वी मला पांढरे घुबड दिसले. मला तो पक्षी खूप वेगळा वाटला. मी आमच्या कार्यालयात नोंद केली. आमच्या आदिवासी पाड्यावर मोठे घुबड दिसतात. शेतातील उंदरे खात असल्याने आम्ही त्यांचे रक्षण करतो. परिसरात मी गिधाडे बघितली आहेत."-गजानन कांबडी, शेतमजूर
"पांजरपोळच्या दाट वृक्षझाडीमध्ये घुबड पाहावयास मिळतात. परिसरात शंभरहून अधिक प्रजातीचे पक्षी आहेत. मोरांची संख्या अधिक आहे. पक्ष्यांसाठी काही क्षेत्र राखीव ठेवले आहे. नैसर्गिक तलावाजवळ पक्ष्यांना पाहण्यासाठी मचाण करणार आहोत."
- विठ्ठल आगळे, व्यवस्थापक, पांजरपोळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.