Nashik News : भद्रकाली पोलिसांकडून 14 गोवंश जनावरांची मुक्तता

भद्रकाली पोलिसांनी विविध ठिकाणी छापा मारून कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या २ लाख ९० हजार किमतीचे १४ गोवंश जनावरांची मुक्तता करत पांजरपोळला रवानगी करण्यात आली.
Senior Police Inspector Gajendra Patil and staff of Crime Investigation Team while rescuing the cattle
Senior Police Inspector Gajendra Patil and staff of Crime Investigation Team while rescuing the cattleesakal
Updated on

Nashik News : भद्रकाली पोलिसांनी विविध ठिकाणी छापा मारून कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या २ लाख ९० हजार किमतीचे १४ गोवंश जनावरांची मुक्तता करत पांजरपोळला रवानगी करण्यात आली.

बेकायदेशीररीत्या गोवंश जनावरे कत्तलीसाठी आणल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांना मिळाली. (Liberation of 14 cattle from Bhadrakali police nashik news)

गुरुवारी (ता. २८) मध्यरात्री सुमारास मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, गुन्हे शोध पथकाचे सतीश साळुंके, नरेंद्र जाधव, लक्ष्मण ठेपणे, सागर निकुंभ, धनंजय हासे, अविनाश जुंद्रे, योगेश माळी, नितीन भामरे, नीलेश विखे, नारायण गवळी, दयानंद सोनवणे यांच्यासह भोई गल्ली परिसरात छापा मारला.

येथील पत्र्याच्या शेडमध्ये २ लाख ५० हजार किमतीचे ११ गोवंश जनावरे आढळून आली. कत्तलीच्या उद्देशाने जनावरे आणले असल्याचे स्पष्ट होताच त्यांची मुक्तता केली. दरम्यान कसईवाडा येथील तेजाळे चौक या ठिकाणीही कत्तलीसाठी जनावरे बांधून ठेवल्याचे माहिती मिळाली.

Senior Police Inspector Gajendra Patil and staff of Crime Investigation Team while rescuing the cattle
Nashik News : कारखान्यांच्या खडखडाटात ‘ढिश्‍क्यांव..ढिश्‍‍क्यांव’..!

त्या ठिकाणीही छापा मारला. ४० हजार किमतीचे ३ गोवंश जनावरांची सुटका केली. रात्रभर सुरू असलेल्या कारवाईत सुमारे २ लाख ९० हजार किमतीचे १४ गोवंश जनावरांची सुटका केली. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Senior Police Inspector Gajendra Patil and staff of Crime Investigation Team while rescuing the cattle
Nashik News : जिल्हा बॅंक अनियमित कर्ज वितरण प्रकरणी आजी-माजी संचालकांचा मंगळवारी फैसला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.